नाशिक

गिरीश महाजनांच्या आवाहनास प्रतिसाद

CD
NSK26H34856 जळगाव : मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ हजारांचा धनादेश मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविताना नगरसेवक अरविंद देशमुख. ----- गिरीश महाजनांची साद, अरविंद देशमुखांचा प्रतिसाद उपशीर्षक दुष्काळासाठी अकरा हजारांची मदत सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : प्रतिनिधी शासनाकडून खात्यात जमा झालेल्या पाच हजार रुपयांच्या दुष्काळ मदतीत स्वतःचे ६ हजार १११ रुपये जोडून महापालिकेचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी ११ हजार १११ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सुपूर्द केला. सध्या आपल्याला या मदतीची गरज नसल्याने अडचणीत असलेल्या दुसऱ्या शेतकरी बांधवाला हातभार लागावा, या भावनेतून आपण हा निर्णय घेतल्याचे देशमुख यांनी सांगितले. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या आणि सध्या मदतीची गरज नसलेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडून मिळालेले पाच हजार रुपये स्वेच्छेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी द्यावेत, असे आवाहन महाजन यांनी केले होते. या वक्तव्यावर समाजमाध्यमांत टीका झाली होती. दरम्यान, महाजन यांना भेटण्यासाठी शेकडो शेतकरी आले होते. त्यांपैकी अनेकांनी निधीसाठी धनादेश सुपूर्द केल्याचे देशमुख यांनी सांगितले. चौकट सरकारवर शेतकऱ्यांनी व्यक्त केला विश्वास भेटीला आलेल्या काही शेतकऱ्यांनी महाजन यांच्या आवाहनाचे कौतुक केले. ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वेच्छेने योगदान द्यावे आणि या निधीतून अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबांना मदत मिळावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दुष्काळाचे संकट मोठे असले तरी त्यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार प्रयत्न करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shevgaon Paithan Highway Accident: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काळाचा घाला; कानिफनाथांच्या दर्शनाहून परतणाऱ्या दोन तरुणांचा अपघातात मृत्यू

Ambad Traffic Jam: दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी; अंबडमध्ये बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा

Yavatmal News: आदिवासी विकासमंत्री अशोक उईके थेट कोलाम पोड्यावर; गणेशवाडीत आदिम बांधवांसोबत साजरी केली दिवाळी

Maharashtra Live News: ‘दिमागी नक्षल’ वक्तव्यावरून राहुल गांधींचे मोदींना पुन्हा चर्चेचे आव्हान

Surakumar Yadav: सूर्यकुमार पुन्हा झाला कर्णधार! BCCI च्या T20 स्पर्धेत करणार मुंबईचं नेतृत्व

SCROLL FOR NEXT