Nashik Milk Rate Fall esakal
नाशिक

Nashik Milk Rate Fall: दूधाचे दर घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत! कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना होतेय कसरत

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : शासनाने दुधाचे दर निश्चित करूनही अवघ्या काही महिन्यांत दूध खरेदी दर कमालीचे घटले आहेत.

परिणामी, दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे. (Farmers in financial trouble due to fall in milk prices Exercising while providing for family nashik)

यंदा पावसाअभावी चारा नाही आणि दुधाचा दरही कमी झाला आह. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. खासगी संकलन केंद्रे कवडीमोल दराने दुधाची खरेदी करीत आहेत. दूध उत्पादकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ आली आहे.

दूधवाढीसाठी आवश्यक पशुखाद्य महागड्या दराने खरेदी करावे लागत आहे. मात्र, दुधाला भाव मिळत नसल्याने सध्या हा व्यवसाय तोट्याचा बनत चालला आहे.

राज्यात रोज दीड कोटी लिटरहून अधिक दुधाचे उत्पादन होते. मागील वर्षापासून दूध व्यवसायास उभारी आली आणि दुधाचे दर ३८ ते ४० रुपये झाले. परिणामी, कोरोना काळात हतबल झालेला शेतकरी दुग्ध व्यवसायात जास्त प्रमाणात उतरला.

लाखो रुपयांच्या संकरित गायी-म्हशी खरेदी करून दुग्धोत्पादन करू लागला. मात्र, अवघ्या काही महिन्यांत दर ढासळत राहिले आणि दिवसेंदिवस व्यवसाय आतबट्ट्यात येऊ लागला. दूधदरासंदर्भात शासनाने नेमलेल्या विविध समित्या कागदावरच असल्याने दराअभावी शेतकरी देशोधडीला लागत आहेत.

त्यात यंदा पावसाने दडी मारल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने व होत्याचे नव्हते झाले. त्याचा परिणाम दुग्ध व्यवसायावर होत आहे.

दूध व्यवसायात खर्चाहून उत्पन्न कमी मिळू लागल्याने लाखाचे बारा हजार होत असल्याचा प्रत्यय उत्पादकांना येत आहे. प्रतिलिटर दहा रुपयांपर्यंत दुधाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचा जोडधंदा संकटात आहे.

शासनाने गठित केलेली दूध दर समितीची बैठक दर तीन महिन्याला होणार होती. बैठक न होताच दुधाचे दर कोसळले कसे, हा संशोधनाचा विषय आहे.

पशुधनाच्या चारा पाण्यासाठी होतोय अमाप खर्च

सरकी ढेप ५० किलोला १६०० ते १७०० रुपये, कांडी खाद्य, ऊस बांडी चार हजार रुपयांना मिळत आहे. सध्या दुधाला २० ते २४ रुपयापर्यंत दर मिळत आहे.

यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतकरी शेती आणि दुग्ध व्यवसायातही कर्जबाजारी होत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

"आमच्याकडे २५ ते २६ गायी आहेत. शेतजमीन नाही. पशुधनावरच कुटुंब चालते. दुधाचे दर दहा ते पंधरा रुपयांनी कमी झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी दूधाचा ३५ ते ४० रुपये दर होता. अतिशय गंभीर परिस्थिती कुटुंबावर ओढवली आहे. सर्व खर्च गाईंच्या चारा पाणीवर जात असून, हातात काहीच मिळत नाही. लवकरात लवकर शासनाने दुधाची दरवाढ करून न्याय द्यावा."

-समाधान उगले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT