नाशिक

कर्जमाफीपासून वंचित शेतकर्यांकडे दोन हजार कोटींची थकबाकी

CD
फोटो : 31770 नाशिक : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देताना भगवान बोराडे, कैलास बोरसे, दिलीप पाटील, बाळासाहेब बोरस्ते, रमेश बोरस्ते. … कर्जमाफीपासून वंचित ५५ हजार शेतकऱ्यांना दिलासा द्या दोन हजार ५० कोटींच्या थकबाकीचा अहवाल; चार तालुक्यांत ५६ टक्के खाते सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ८ : राज्य शासनाने आतापर्यंत चार वेळा कर्जमाफी केली; मात्र त्याचा एकदाही लाभ न मिळालेल्या जिल्ह्यातील ५५ हजार १९९ शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांकडे ९०८ कोटी रुपयांची थकीत मुद्दल असून, त्यावरील एक हजार ६६२ कोटी रुपयांच्या व्याजासह एकूण दोन हजार ५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी शेतकरी समन्वय समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, आदिवासी सहकारी संस्थेचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे, सदस्य दिलीप पाटील, बाळासाहेब बोरस्ते, रमेश बोरस्ते व मनोहर पाटील यांनी यासाठी आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आतापर्यंतच्या कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीने २००८ ते २०२६ या कालावधीतील कर्जमाफी योजनांचा अभ्यास केला. निसर्गाची अनिश्चितता, हवामानातील बदल तसेच द्राक्ष, कांदा, डाळिंब आणि भाजीपाल्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांमधून वगळलेल्या सर्व शेतकऱ्यांचा समावेश असलेली व्यापक कर्जमाफी योजना राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच थकीत मुद्दल सुलभ हप्त्यांत भरण्याची एकरकमी कर्जफेड योजना सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून राबवावी, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा अहवाल राज्याच्या सहकार विभागाकडे पाठविल्याचे शेतकरी संघटनेने म्हटले आहे. चार तालुक्यांत ५६ टक्के खाती जिल्ह्यातील ५५ हजार १९९ शेतकऱ्यांकडे दोन हजार ५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी दिंडोरी, निफाड, येवला आणि मालेगाव या चार तालुक्यांतील खात्यांचे प्रमाण ५६ टक्के आहे. या चार तालुक्यांतील शेतकऱ्यांकडे तब्बल ७९७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे शासनाने या अहवालाचा गांभीर्याने विचार करून कर्जमाफीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patekar : नानाची वाडी झाली सुन्न! सिंहगडाच्या मातीत रमलेला, आणि येथेच विसावला; ग्रामस्थांची भावना

IndiGo Winter Schedule : प्रवाशांना मोठा झटका! बेळगाव-दिल्ली विमानसेवेला 'विंटर' ब्रेक; इंडिगो कंपनीकडून सेवांमध्ये बदल, आता आठवड्यातून तीनच उड्डाणे

Dhruv Rathee Bengaluru Protest : ध्रुव राठी पहिल्यांदाच उतरला रस्त्यावर! बंगळूरमध्ये SIR विरोधात आंदोलन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, मोदींवरही सडकून टीका

Latest Marathi News Live Update: नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान- रामदास आठवले

Viral Picture : डेल टेक्नॉलॉजीजच्या संस्थापकाच्या पत्नीला सोशल मीडियावर केले ट्रोल; संपत्ती वाचून डोळे पांढरे होतील..!?

SCROLL FOR NEXT