Farmers Long March
Farmers Long March esakal
नाशिक

Long March: बुधवारपासून अकोले ते लोणी दरम्यान शेतकऱ्यांचा लॉगमार्च! विखे पाटलांच्या कार्यालयासमोर करणार आक्रोश

अजित देसाई

Long March : अखिल भारतीय किसान सभा व इतर समविचारी संघटनांनी बुधवार दि.26 पासून अकोले ते लोणी दरम्यान तीन दिवसांचा लॉंग मार्च आयोजित केला आहे. राज्याचे महसूल व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर दिनांक 28 एप्रिल रोजी शेतकऱ्यांचा हा मोर्चा धडकणार आहे.

या मोर्चाला भूमिपुत्र शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला असून नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकरी या मोर्चा त सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या संबंधित मागण्यांबाबत महसूल मंत्र्यांसोबत चर्चा करतील, अशी माहिती भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बबन जगताप यांनी दिली. (Farmers long march between Akole and Loni from Wednesday Protest in front of Vikhe Patil office nashik news)

सन २०१७ व २०१९ अशा दोन्ही कर्जमाफी योजनांमधून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यासाठी या योजनेत योग्य ते बदल करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे.

दुग्ध पदार्थ आयात करण्याच्या सरकार दरबारी हालचाली सुरू असून त्या त्वरित थांबाव्यात. शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला उत्पादन खर्चावर आधारित प्रति लिटर किमान 45 रुपये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 65 रुपये भाव देण्यात यावा.

महाविकास आघाडी सरकारने दूध एफ आर पी बाबत स्थापन केलेल्या अजित पवार समितीच्या शिफारशी लागू कराव्यात. दूध भेसळ विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करून ग्राहकांना शुद्ध दूध रस्त दरात उपलब्ध होईल याची कायदेशीर हमी द्यावी.

परतीच्या अवकाळी पावसाने शेतीमालाचे अतोनात नुकसान झालेले आहे. सरकारने मदतीची घोषणा केली. मात्र, सदर पंचनामे व दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषांपेक्षा दुप्पट मदत तातडीने जाहीर करावी.

वीज बिलांची सक्तीची वसुली थांबून विज बिल सरसकट माफ करावे, शेतीला पूर्ण दाबाने दिवसा बारा तास वीज देण्यात यावी, विजेच्या तारांचे शेतात पडलेले झोळ दुरुस्त करून वीज वाहिन्यांची राज्यभर दुरुस्ती करावी.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

२०१८ साली पिक विमा मंजूर होऊनही त्याचा लाभ शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत देण्यात आलेला नाही संबंधित कंपनीची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना देण्यात येणार आहे.

अकोले येथून बुधवारी या मोर्चाला सुरुवात होईल संगमनेर मार्गे लोणी येथे तिसऱ्या दिवशी मोर्चेकरी शेतकरी नामदार विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर धडक देणार आहेत.

हा लॉन्ग मार्च यशस्वी करण्यासाठी भूमिपुत्र संघटनेचे सचिव किरण वाबळे, अशोक आंधळे ,संतोष हांडे ,असिफ शेख, निलेश तळेकर, संतोष राम वाडेकर, संतोष वाबळे ,सिताराम देठे, रावसाहेब झांबरे,

संतोष कोरडे,बाळासाहेब वाळुंज, विशाल करंजुले, संजय भोर, राजु रोकडे,वसंत साठे, अविनाश देशमुख, महेश झावरे, सतीश तनपुरे, बबन जगताप ,किसन पवार, नाना काशीद, संदीप जाधव,संतोष गागरे, नंदन भोर, सुरेश गोळे ,संदीप शिंदे ,मंजाबापू वाडेकर, अन्सार पटेल, पांडुरंग पडवळ, नितीन बुरके यांच्यासह असंख्य कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT