Farmers meet tomorrow in presence of Deputy Chief Minister Ajit Pawar nashik news esakal
नाशिक

Nashik Shetkari Melava : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या शेतकरी मेळावा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Shetkari Melava : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ४ वर्षात कळवण- सुरगाणा विधानसभा मतदारसंघात अकराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे विविध विकासकामे प्रगतिपथावर आहेत. (Farmers meet tomorrow in presence of Deputy Chief Minister Ajit Pawar nashik news)

याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच आमदार नितीन पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकरी व कृतज्ञता आणि अभीष्टचिंतन सोहळा होत आहे. ४९४ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण शनिवारी (ता.७) सकाळी दहाला होत असल्याची माहिती आमदार नितीनभाऊ पवार अभीष्टचिंतन सोहळा समितीने दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण होणार आहे. अध्यक्षस्थानी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ असतील.

विशेष पाहुणे म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पालकमंत्री दादा भुसे, प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे, आमदार सर्वश्री माणिकराव कोकाटे, दिलीपराव बनकर, डॉ. राहुल आहेर, सौ. सरोज अहिरे, हिरामण खोसकर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, दिलीप बोरसे, राहुल ढिकले, नरेंद्र दराडे, सुहास कांदे, किशोर दराडे, सत्यजित तांबे, मविप्रचे सरचिटणीस अँड नितीन ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदी उपस्थित राहतील. या सोहळ्याला कळवण सुरगाणा तालुक्यातील जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार नितीन पवार अभिष्टचिंतन सोहळा समितीने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या सरासरी मासिक पगारात ७ वर्षांत फक्त ४,५६५ रुपयांची वाढ! सरकारी आकडेवारी समोर

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT