नाशिक

रावळगाव साखर कारखान्याकडे चार कोटी थकल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन

CD
फोटो -16026 मालेगाव : आंदोलनकर्त्यांना लेखी आश्‍वासन देताना तहसीलदार विशाल सोनवणे. शेजारी निखिल पवार. ----- नवापूर, साक्री येथील शेतकऱ्यांची अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे तहसीलदारांच्या लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन मागे सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. २ : रावळगाव येथील एस. जी. एनर्जी या खासगी कारखान्याकडे साक्री, नवापूर येथील शेतकऱ्यांचे चार कोटी उसाचे थकले आहेत. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांकडून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. तरीही साखर कारखान्यातर्फे रक्कम अदा केली नाही. त्यामुळे शुक्रवारी (ता. २) महात्मा गांधी जयंतीनिमित्त नवापूर व साक्री येथील शेतकऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तहसीलदारांनी लेखी आश्‍वासन दिल्यानंतर तासाभरात आंदोलन मागे घेण्यात आले. रावळगाव साखर कारखान्यात शेतकऱ्यांनी ऊस पुरविला आहे. मात्र ८९ शेतकऱ्यांचे चार कोटी रुपये थकले आहेत. अनेक दिवसांपासून निवेदने देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. निखिल पवार म्हणाले, की अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे ऊस उत्पादक शेतकरी व आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मात्र तरीही स्पायका ग्रुफ ऑफ एनर्जीतर्फे शेतकऱ्यांचे पैसे दिले जात नाही. ८९ शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची रक्कम देण्यात आली नाही. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. भास्कर बिरारीस, भूषण अहिरराव, लिंकेश अहिरराव, दिलीप सोनवणे, अरुण गावित, जीवन वसावा, मगन कातोडिया, कोमलसिंग राजपूत, लक्ष्मण सोनवणे, विजय अहिरराव, निखिल पवार, डॉ. रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT