tomato  esakal
नाशिक

Nashik News: सांगा आता जगायचं तरी कसे? शेतकऱ्यांचा सरकारला सवाल! टोमॅटोचा झाला लाल चिखल,भावात निचांकी घसरण

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सप्टेंबर उजाडूनही पावसाने पाठ फिरवली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले टोमॅटोचे भाव कोसळल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. बाजार समितीत २० किलोच्या क्रेट्‌सला केवळ ५० ते १०० रुपये भाव मिळत आहे.

यामुळे ‘मायबाप सरकार सांगा आता जगायचं तरी कसे, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. (farmers question to government Tomato crop destroyed price fell to lowest level Nashik News)

१५ दिवसापासून ही घसरण थांबण्याचे नाव घेत नसून एक एकर टोमॅटोसाठी रोपे, मलचीग पेपर, रासायनिक खते, औषधे, तारी, टोकरे, ड्रीपसह मशागतीसाठी जवळपास २ लाख ५० हजार रुपये खर्च येत आहे.

पावसाने ओढ दिल्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केलेले पिकांकडे संपूर्ण खर्च करूनही दुर्लक्ष करावे लागले. त्यामुळे टोमॅटो लागवड केलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी टँकरने पाणी घालून टोमॅटो जगवले.

मात्र, मोठ्या कष्टाने पिकवलेला टोमॅटो ६० ते १०० किलोमीटरचा प्रवास करूनही बाजार समितीत कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा साधा वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे.

उत्पादन खर्चाचा विचार केला तर शेतकऱ्यांवर स्वतःच्या खिशातून पैसे टाकण्याची वेळ आली आहे. बाजारभावाबाबत बेभरवशाचे व जुगारी पीक, असे टोमॅटोबाबत पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. बाजारभाव कोसळल्याने मोठ्या अपेक्षेने टोमॅटोची लागवड केलेल्या शेतकऱ्यांची पदरी निशारा येण्याची चिन्हे आहेत. थट्टाचं झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.5;

त्यामुळे पिके उभी करण्यासाठी घेतलेले कर्ज फेडायचे कुठून? मुलांचे शिक्षण कसं करावे? परीक्षेची फी कुठून भरावी? कुटुंब कसे चालवावे, असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी सरकारला विचारलेत. अगोदरच दुष्काळाच्या झळांनी होरपळत असलेला शेतकरी पुन्हा सुलतानी संकटाने हतबल होत आहे.

दिल्लीतील जी २० शिखर परिषद शेतकऱ्यांच्या मुळावर

दिल्लीत सुरू असलेल्या जी २० शिखर परिषदेमुळे दिल्लीत सुरक्षेच्या कारणास्तव बाजार समित्या बंद केल्या आहे. त्यामुळे दिल्लीत खरेदी बंद आहे.

याचा काही प्रमाणात परिणाम स्थानिक बाजारावर झाला असल्याचे पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील टोमॅटो व्यापाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: म्हाडाचे भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार

SCROLL FOR NEXT