नाशिक

शिवार खरेदीला बळी पडू नये

CD
पान-१० वर ॲंकर मुख्य अंक ------------------ सकाळ विशेष--लोगो ---------- शेतकऱ्यांनी शिवार खरेदीला बळी पडू नये! ---------- मनीषा पगार ः मुक्ताई कंपनीच्या खरेदीत पावणेदोन कोटींची फसवणूक -------------- सकाळ वृत्तसेवा नामपूर, ता.२७ : ताहाराबाद (ता. बागलाण) येथील मुक्ताई ट्रेडिंग कंपनीने शेतमालाच्या लिलावानंतर शेतकऱ्यांचे सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचे पेमेंट थकविले असून जायखेडा पोलिसात फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल आहेत. शिवार खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून शेतकऱ्यांनी शिवार खरेदीच्या आवाहनाला बळी पडू नये, असे आवाहन नामपूर बाजार समितीच्या सभापती मनीषा पगार यांनी केले आहे. ------------------ मुक्ताई ट्रेडिंग कंपनीने बाजार समितीच्या आवारात लिलावाद्वारा शेतमालाची खरेदी केलेली नाही. शेतकऱ्यांनी परस्पर शिवार खरेदीतून या कंपनीला शेतमालाची विक्री केली, त्यातून फसवणूक झालेली आहे. संबंधित शेतकऱ्यांकडे बाजार समितीची कोणत्याही प्रकारची अधिकृत काटा पट्टी, सौदा पट्टी व हिशोब पट्टी सादर केलेली नाही. एकाही शेतकऱ्यांची पेमेंट थकीत असल्याबाबत कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार बाजार समितीकडे दाखल केलेली नाही असे पगार यांनी म्हटले आहे. मुक्ताई ट्रेडिंग कंपनीचे संचालक नारायण बागूल यांनी ३० जानेवारीपर्यंत बाजार समितीत खरेदी केलेल्या शेतमालाचे पेमेंट शेतकऱ्यांना दिलेले आहे. त्यानंतर १ फेब्रुवारीपासून कंपनीने बाजार समितीची अनुज्ञप्ती जमा करून समितीच्या आवारात कोणत्याही प्रकारचा शेतमाल खरेदी केलेला नाही. त्यानंतर मात्र कंपनीने शिवार खरेदी करून शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केलेली आहे. मुक्ताई ट्रेडिंग कंपनीबाबत बाजार समितीकडे शिवार खरेदीत फसवणूक झाल्याबाबत कोणतीही तक्रार दाखल नाही. ---------------- कोट नामपूर बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी मुख्य बाजार आवार नामपूर, उपबाजार आवार करंजाड, तसेच तात्पुरते मका खरेदी-विक्री केंद्र जायखेडा येथे लिलावासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतमाल विक्रीनंतर रोख पेमेंट अदा होत असतानाही शिवार खरेदीच्या आमिषाला बळी पडू नये. त्यात फसवणूक झाल्यास बाजार समिती जबाबदार नसेल. - मनीषा पगार, सभापती नामपूर बाजार समिती ------------- १६-१ चौकट शिवार खरेदीची स्थिती - शेतमाल विक्रीचा व्यवहार : ३ कोटी ५४ लाख ८० हजार ५०२ - वसूल झालेली रक्कम : १ कोटी ८५ लाख ४० हजार ५८१ रुपये - व्यापाऱ्यांकडे थकित रक्कम : १ कोटी ६९ लाख ३९ हजार ९२१ रुपये कोट यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत मुक्ताई ट्रेडिंगने केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीमुळे दुष्काळात तेरावा महिना अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. याबाबत आंदोलन करूनही संशयित मोकाटच आहे. शासनाने दोषींवर कठोर कारवाई करावी. - मयूर नेरकर, शेतकरी नांदीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

Latest Marathi News Live Update : शेतकरी प्रोत्साहन निधीच्या प्रतीक्षेत, कर्जमाफीच्या चार याद्या जाहीर; वर्ष उलटूनही ५० हजारांची मदत खात्यात जमा नाही

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

अवघ्या १० मिनिटांचं अंतर तरीही आईवडिलांपासून दूर राहते वैदेही परशुरामी; कारण सांगत म्हणाली- अनेक नातेवाईकांनी त्यांना...

SCROLL FOR NEXT