burned sugarcane field esakal
नाशिक

Nashik : अचानक उसाला लागल्याने शेतकऱ्याचे झाले आर्थिक नुकसान

सकाळ वृत्तसेवा

दरेगाव (जि. नाशिक) : येथील ऊसाच्या शेताला (Sugarcane Farm) सोमवारी (ता. ६) अचानक आग (Fire) लागली. आगीत ऊस व पाईप खाक (Burned) झाले आहेत. (Farmers suffer financial loss of 47000 due to sudden onset fire of sugarcane Nashik News)

साखरबाई गोविंद पगार यांच्या शेत गट क्रमांक ४१९ मध्ये ऊसाची बेण्यासाठी लागवड केली होती. सोमवारी अचानक ऊसाच्या शेताला आग लागली. संपूर्ण शेतातील उस जळाल्याने पगार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. उसाला पाणी भरण्यासाठी पीव्हीसी पाईपची लाईन टाकली होती. ऊसाला आग लागल्याने पाईपही जळाले. ऊसाचे ४० हजार हजार व पाईपचे सात हजार ५००, असे एकूण ४७ हजार पाचशे रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी सहाय्यक अधिकारी निरभवणे यांनी शेतात पंचनामा केला. सरपंच अमोल देवरे, पोलिसपाटील समाधान गांगुर्डे, सोमनाथ देवरे, विक्रम पगार, माधव पगार या वेळी उपस्थित होते.

दरम्यान, सोमवारी अचानक झालेल्या वादळी वारा व पावसासह कानिफनाथ महाराज मंदिराजवळ वीजखांब पडून वीज तारा तुटल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागली. अचानक आलेल्या वादळ व पावसाने शेतकऱ्यांची शेतीमाल झाकण्यासाठी तारांबळ उडाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Viral News: मुंबई मेट्रोत मांजरीला लागली 'नोकरी'! MMMOCL ने दिलं Chief Feline Officer पद, ड्युटीही ठरवली

Hospital Fire Audit : आरोग्य विभागाचे वरातीमागून घोडे; अमरावती दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट

Mehkar Hospital Negligence : मेहकरमध्ये रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटरवर रस्त्यावर प्रसूती; आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत नाकारल्याने संताप

Marathi News Live Updates : एका व्यावसायिक इमारतीत आग

IND vs SL: 'तू वेळ वाया घाववतोय ब्रो...', सर्फराज खानची श्रीलंकन कर्णधाराला स्लेजिंग, Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT