नाशिक

शेतकऱ्याच्या मालाला व्यापाऱ्यांकडून ‘कट्टी’ का?

CD
(धुळे ४ साठी मेन) -- NEJ26B02265 पिकाची विक्री व्यापाऱ्याला करताना शेतकरी. (AI छायाचित्र) -- शेतीमालाच्या वजनातील ‘कट्टी’ने शेतकरी त्रस्त! - नेर बाजारपेठीची स्थिती : खरेदी- विक्री व्यवहारात पारदर्शकतेची मागणी सकाळ वृत्तसेवा नेर, ता. ७ : धुळे तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या नेरमध्ये शेतीमालाच्या खरेदी-विक्रीदरम्यान वजनातून विनाकारण केली जाणारी ‘कट्टी’ (घट) शेतकऱ्यांच्या जीवावर येत आहे. वर्षभर अहोरात्र काबाडकष्ट करून पाणीटंचाई व अपुऱ्या पावसात कष्टाने पिकवलेला शेतीमाल बाजारात आणल्यानंतर विविध कारणे सांगून वजनात कपात केली जात असल्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. वाढता उत्पादन खर्च आणि अपुरे बाजारभाव यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या अन्नदात्याला या ‘कट्टी’च्या भुर्दंडामुळे मोठा फटका सहन करावा लागत आहे. ----- नेरसह जुने भदाणे, नवे भदाणे, खंडलाय, देऊर, लोणखेडी, लोहगड, अकलाड, मोराणे प्र. नेर आणि शिरधाणे प्र. नेर या परिसरातील शेकडो शेतकरी शेतीमालाच्या विक्रीसाठी नेर येथील बाजारपेठेवर अवलंबून आहेत. कांदा, मका, कापूस, बाजरी, ज्वारी यांसारखी पिके घेण्यासाठी शेतकरी वर्षभर मोठी मेहनत घेतात. मात्र, हा माल विकायला नेल्यावर मालाची प्रतवारी, खराब माल, ओलावा किंवा कचरा यांसारखी कारणे पुढे करून वजनातून कपात केली जाते. ही कपात नेमकी कोणत्या नियमांनुसार केली जाते? याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे. - पारदर्शक व्यवहारांची गरज मालाचे प्रत्यक्ष वजन किती झाले, त्यातून नेमकी किती कट्टी करण्यात आली, कट्टीचे कारण काय आणि अंतिम देय रक्कम किती, याची स्पष्ट माहिती शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. शहरांच्या मोठ्या बाजारपेठांमध्ये अशा प्रकारच्या कट्टीची प्रथा नसताना ग्रामीण भागात ती लादल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे. बाजार समिती व संबंधित प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन वजनमापे, कट्टीचे प्रमाण आणि प्रतवारी प्रक्रियेची तपासणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. - १४-१ ...कोट... १४-१ उत्पादन खर्च वाढलाय, पण समाधानकारक भाव मिळत नाही. त्यात कष्टाचा माल विकताना वजनातून ‘कट्टी’ केली गेल्याने हातात येणारी रक्कम आणखीनच रोडावते. वजन, कट्टीचे कारण आणि अंतिम रकमेची पारदर्शक माहिती मिळालीच पाहिजे. - दगडू लाला बिरारी, शेतकरी, नेर ------- कांदा सात- आठ महिने सांभाळून, कोरडा करून शेतकरी प्रतवारी करून विकायला आणतो. तरीही कट्टी लावली जाते. कोरडाठाक कापूस दुष्काळी परिस्थितीत विक्रीला नेला तरी घट कापली जाते. ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पिकावर कोणतीही कट्टी घेऊ नये. - लोटन राजाराम माळी, शेतकरी, नेर ---------- आमच्याकडे मका, गहू खरेदी केला जातो. शेतकरी ओला माल आणल्यास त्याची प्रतवारी तपासून घट लावतो आणि तो माल नंतर सुकवावा लागतो. आम्ही शेतकऱ्याला कोणतीही हमाली लावत नाही. प्रतवारी उत्तम असेल तर भावही चांगला मिळतो. व्यापारी म्हणून मीदेखील कट्टी बंद करायला तयार आहे; पण मालाची प्रतवारी किंवा गुणवत्ता निकृष्ट असेल, तर मिळणाऱ्या भावात प्रतिक्विंटल २० ते ३० रुपयांची तफावत आणावीच लागते. - पंकज जैन, व्यापारी, नेर (ता. धुळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''माझ्याविरोधात 45 एफआयआर आहेत, 100 पाहिजेत...'' राहुल गांधींनी सुरु केला रस्त्यावरचा एल्गार

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतरकडे निघालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी अडवले; राहुल गांधी, प्रियंका गांधी ताब्यात

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

DCM Sunetra Pawar : दुष्काळाची जाणीव ठेवा; ऊस जगविण्याचे आव्हान मोठे

Navratri 2026: घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त 'या' वेळेत; जाणून घ्या नवरात्रीतील पूजा, नियम अन् शुभ रंग!

SCROLL FOR NEXT