नाशिक

एफ एस एस प्रणाली लागू

CD
(पान ३ ला ॲंकर) शेतकऱ्यांना घरबसल्या खताचे बुकिंग करता येणार शासनाची ‘फार्मवर्क फर्टिलायझर सेल’ प्रणाली लागू सकाळ वृत्तसेवा निमगूळ, ता. २३ : खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी शेतकऱ्यांना घरबसल्या खताचे बुकिंग करता येणार असून, उपलब्ध विक्रेत्याची निवड करून क्युआर कोडद्वारे खत मिळणार आहे. धुळे जिल्ह्यासाठी गुरुवार (ता. २२) पासून रासायनिक खतांच्या विक्रीसाठी एफएफएस (फार्मवर्क फॉर फर्टिलाझर सेल) प्रणाली सुरू झाल्याने खतांचा काळाबाजार थांबणार असून, मनमानीला चाप बसणार आहे. शेतकऱ्यांना या प्रणालीचा वापर करतांना ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. ॲप वापरताना आधार आधारित किंवा फार्मर आयडी आधारित लॉगिन करावे. प्रणालीत दिसणाऱ्या सर्वे नंबर/ शेतजमिनींपैकी ज्या जमिनीसाठी खत हवे आहे, ती निवडावी, पिकाची माहिती व आवश्यक खताचे प्रमाण नोंदवावे, आवश्यकतेनुसार खत उपलब्ध असलेल्या सोयीच्या विक्रेत्याची निवड करावी, विक्रेता निवडल्यावर मोबाईलवर एक क्युआर कोड तयार होईल. विक्रेत्याकडे जाऊन क्युआर कोड दाखवावा, तो स्कॅन करून नियमानुसार खत दिले जाईल. मोबाईलवर तयार झालेला क्युआर कोड ७२ तासांसाठी वैध राहील. त्यानंतर तो कालबाह्य होईल व पुन्हा बुकिंग करावे लागेल. प्रणालीचे प्रमुख फायदे पिकानुसार व क्षेत्रानुसार आवश्यक तेवढेच खत मिळेल, मुख्य खतासोबत इतर अनावश्यक खत खरेदीची सक्ती होणार नाही, अनधिकृत साठवणूक आणि कृत्रिम टंचाईवर नियंत्रण राहील. कृषी उपयोगाच्या युरियाचा औद्योगिक वापर रोखण्यास मदत होईल. अधिकृत नोंदींमुळे बनावट किंवा डुप्लिकेट खत विक्रीला चाप बसेल. घरबसल्या उपलब्धता पाहून बुकिंग करता येत असल्याने दुकानांसमोर रांगा लावाव्या लागणार नाहीत. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने ॲप डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. ------- तालुक्यातील शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठी ‘एफएफएस’ प्रणालीचाच वापर करावा. अनधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करू नये. खताची लिंकिंग, जादा दराने विक्री किंवा काळाबाजार आढळल्यास तत्काळ प्रशासनाकडे तक्रार करावी. - सुधीर ईशी, तालुका कृषी अधिकारी, शिंदखेडा ------- शेतकऱ्यांसाठी ही योजना उपयुक्त असून, त्यांना याचा लाभ होणार आहे. योजना पारदर्शक असून ज्यांना खत लागणार आहे त्यांना वेळेवर उपलब्ध होईल. या योजनेमुळे शेतकऱ्याचा त्रास कमी होईल. - संजय अग्रवाल, शाम एजन्सी, दोंडाईचा ------ ‘एफएफएस’ प्रणालीमुळे खतांची उपलब्धता जाणून आवश्यक खतांचे आरक्षण करता येईल. यामुळे खरेदीसाठी होणारी धावपळ कमी होऊन अनावश्यक साठा टाळता येईल व विक्री व्यवहारात सुस्पष्टता येईल. - मयूर भामरे, गुण नियंत्रण अधिकारी, शिंदखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

Baramati News : निवडणूक पदवीधरची....बारामतीचे राजकारण ढवळून निघाले...

Marathi News Live Updates: FDA चा औषध विक्रेत्यांना दणका; राज्यात २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

Shri Someshwar Sugar Factory : सोमेश्वरच्या सभासद-कामगारांची दिवाळी झाली गोड! 90 कोटींच्या रकमा खात्यावर वर्ग; सभासदांना उर्वरित बिल तर कामगारांना बोनस जमा

Pune News : दिवाळीत फटाके उडविताना घ्या खबरदारी; अग्निशामक दलाकडून सुरक्षिततेची नियमावली

SCROLL FOR NEXT