balasaheb sonawane.jpg 
नाशिक

भोजापूर धरणात सापडलेल्या मृतदेहाचे अखेर गूढ उकललेच! धक्कादायक खुलासा

अजित देसाई

नाशिक : (सिन्नर) मद्यपान करून कुटुंबीयांना सातत्याने शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या, स्वतःची पत्नी अन्‌ मुलीला देखील वनवासात ठेवणाऱ्या मुलास जन्मदात्या पित्यानेच अखेरचा श्वास घ्यायला लावला. वाचा काय घडले?

काय आहे घटना

कासारी दुमाला (ता. संगमनेर) रानात ज्ञानेश्वर माधव सोनवणे (वय ३०) या तरुणाचा मृतदेह गुरुवारी (ता. २७) सायंकाळी सातच्या सुमारास भोजापूर धरणात पाण्यासोबत वाहून आल्याचा प्रकार घडला होता. रात्रीच्या वेळी धरण परिसरात पोचणे शक्य नसल्याने पोलिसांनी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. २८) सकाळी मनेगावसह सोळा गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या पंपिंग स्टेशनजवळून हा मृतदेह ताब्यात घेतला होता. मृतदेहाचे दोन हात बांधलेल्या अवस्थेत असल्याने प्रथमदर्शनीच हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले होते. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी आलेल्या अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपअधीक्षक माधव रेड्डी यांनी सहाय्यक निरीक्षक रणजित गलांडे व त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करत तपासाची दिशा निश्चित केली होती. मृतदेहाचा ताबा घेण्यासाठी आलेला ज्ञानेश्वरचा भाऊ बाळासाहेब याच्याकडून विसंगत उत्तरे मिळत असल्याने व तो काहीसा घाबरलेला असल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. 

चोवीस तासांत गुन्ह्याची उकल

शनिवारी (ता. २९) सकाळी सहाय्यक निरीक्षक गलांडे यांनी थेट कसारा दुमाला गाठत कुटुंबीयांकडून माहिती घेतली. या वेळी मृत ज्ञानेश्वरचे वडील माधव गबाजी सोनवणे व भाऊ बाळासाहेब यांच्याकडून विसंगत माहिती मिळाली. या दोघांनाही संशयावरून ताब्यात घेत नांदूरशिंगोटे दूरक्षेत्र येथे आणण्यात आले. उपअधीक्षक रेड्डी यांच्या समक्ष दोघांनी ज्ञानेश्वरचा काटा काढल्याची कबुली दिली. भोजापूर धरणात पाण्यासोबत वाहून आलेला मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या चोवीस तासांत वावी पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करत मृताच्या सख्ख्या लहान भावासह वडिलांना बेड्या घातल्या. 

असा घडला प्रकार 

मद्यपानाचे व्यसन असलेला ज्ञानेश्वर घरी आल्यानंतर आई-वडील व भावाला नेहमीच अर्वाच्य शिवीगाळ व प्रसंगी मारहाणदेखील करायचा. त्याच्याविरोधात कुटुंबीयांनी दोन ते तीन वेळा संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तक्रारीदेखील केल्या होत्या. ज्ञानेश्वर याचा प्रेमविवाह झालेला असून, त्याला तीन वर्षांची मुलगी आहे. मात्र, दारूच्या व्यसनाला कंटाळून त्याची पत्नी दोन वर्षांपासून घुलेवाडी येथे आई-वडिलांकडे मुलीसमवेत राहत होती. सोमवारी (ता. २४) रात्री मद्यपान करून आलेल्या ज्ञानेश्वरने वडील व भावाला लाकडी दांड्याने मारहाण केली. राग अनावर झाल्याने या दोघांनी त्याला चोप दिला. या मारहाणीत मद्यधुंद ज्ञानेश्वर बेशुद्ध पडला. लाकडी दांड्याने प्रहार करण्यात आल्याने त्याचे दोन्ही पाय पोटच्या भागात मोडले होते. त्याला तशाच अवस्थेत दुचाकीवर बसवत दोघांनी सिन्नर तालुक्यात म्हाळुंगी नदीवरील पूल गाठला. त्याचे दोन्ही हात दोरीने बांधून पाण्यात ढकलून दिले. 

संपादन : किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

SCROLL FOR NEXT