नाशिक

भगूरच्या ऑईल मिलवर ‘एफडीए’ची धाड

CD
भगूरच्या ऑइल मिलवर ‘एफडीए’चा छापा बोगस सोयाबीन तेलाचा तीन हजार किलोंचा साठा जप्त सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध व सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेंतर्गत भगूर येथील पंकज ऑइल मिलवर छापा टाकून साडेपाच लाख रुपये किमतीचा तीन हजार २१० किलो संशयास्पद सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, नाशिक विभागाचे सहआयुक्त मंगेश माने व सहायक आयुक्त (अन्न) संदीप देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली भगूर येथील तेल रिपॅकर आस्थापनेची तपासणी करण्यात आली. या वेळी साठवून ठेवलेले रिफाइंड सोयाबीन तेल निकृष्ट व कमी दर्जाचे असल्याचा संशय आल्याने अधिकाऱ्यांनी तत्काळ जप्तीची कारवाई केली. अन्न व प्रशासन विभागाने गुरुवारी (ता. २२) भगूरच्या पंकज ऑइल मिलवर छापा टाकला होता. या वेळी पाच लाख ४७ हजार रुपयांचा निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला. ही कारवाई सहायक आयुक्त संदीप देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी प्रतीक भड यांनी केली. सणासुदीच्या काळात भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत काही संशय असल्यास नागरिकांनी complaints.mahafda.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, तसेच सर्व अन्न व्यावसायिकांनी परवाना घेऊनच नियमानुसार व्यवसाय करावा, असे आवाहन ‘एफडीए’मार्फत करण्यात आले आहे. जप्त मुद्देमाल -​रिफाइंड सोयाबीन ऑइल (लूज) : २,५०० किलोग्रॅम ​-रिफाइंड सोयाबीन ऑइल (डेली युज्ड ब्रँड) : ७१० किलोग्रॅम ​एकूण जप्त साठा : ३,२१० किलोग्रॅम (किंमत ५ लाख ४७ हजार रुपये) फोटो : H33464 नाशिक : भगूर येथील पंकज ऑइल मिलवर धाड टाकून जप्त करण्यात आलेला सोयाबीन तेलाचा साठा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBI Arrests ED officers : दुसऱ्यांवर धाडी टाकणाऱ्या ED अधिकाऱ्यांवरच CBI ची झडप! केसमधून वाचवण्यासाठी केला होता 'हा' मोठा सौदा

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Latest Marathi News Live Update : नवजात बाळाचा मृत्यूनंतर काही दिवसांतच मातेचाही मृत्यू

Andhra Politics: भाचीच्या लग्नात मामाचाच खोडा; चंद्राबाबू नायडू कोणाला म्हणाले ‘कंसमामा’?

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

SCROLL FOR NEXT