child depression.jpg 
नाशिक

मैदान सुटले..घराबाहेर न पडणे..लॉकडाऊनमुळे बालकांना 'या' गोष्टीची भीती..जाणकार म्हणतात...

गायत्री जेऊघाले : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : तीन महिन्यांपासून लहान मुले दिवसभर घरीच आहेत. मित्र-मैत्रिणींसोबत भेट होत नसल्याने आणि मैदानी खेळ कमी झाल्याने मुले मोबाईलला चिकटून आहेत. या काळात मुले तासन्‌तास कोणाशी न बोलता मोबाईलचा वापर करीत असून, त्याचा वाईट परिणाम होतोय असे जाणकारांचे म्हणणे आहे.

चिमुरडे एकलकोंडे होण्याची भीती..जाणकार म्हणतात...

शाळा बंद असल्याने तीन महिन्यांपासून लहान मुले दिवसभर घरीच आहेत. मित्र-मैत्रिणींसोबत भेट होत नसल्याने आणि मैदानी खेळ कमी झाल्याने मुले मोबाईलला चिकटून आहेत. या काळात मुले तासन्‌तास कोणाशी न बोलता मोबाईलचा वापर करीत असून, त्याचा वाईट परिणाम त्यांचा मानसिकतेवर होत आहे. याबरोबरच त्यांच्या चिडचिडेपणा, नैराश्‍यही वाढले आहे. 
लॉकडाउनमुळे घरी थांबून दिवसभर काय करावे, हा मोठा प्रश्‍न सर्वांसमोर निर्माण झाला आहे. घरातील मोठी मंडळी स्वतःला कामात गुंतवून दिवस काढत आहेत. लहान मुले मात्र दिवसभर मोबाईलला चिकटून बसल्याचे चित्र आहे. तासन्‌तास मोबाईलवर गेम खेळणे, कार्टून बघणे, आपल्या आवडीची गाणे ऐकणे आदी प्रकार करीत आहेत. जवळपास सर्वच बालकांना मोबाईलचे व्यसन जडले असून, याचा वाईट परिणाम त्यांच्यावर होत आहे. 

एकाग्रतेवर परिणाम 
मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे मुले एकलकोंडी होत आहेच, सोबतच त्यांच्या एकाग्रतेवरही परिणाम होत आहे. मुलांनी घरात बैठे खेळ खेळावे, बौद्धिक क्षमता वाढेल अशी पुस्तके वाचावित, असे आवाहन मानसोपचारतज्ज्ञ करीत आहेत. पालकांनीही दिवसभर आपले पाल्य काय करीत आहे, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नेहमी मुलांना शाळा नकोशी वाटत असली तरीही लॉकडाउनमध्ये मुले शाळेला अधिक "मिस' करत आहेत. शाळेतील मित्र-मैत्रिणींची भेट होत नसल्याने एकटेपणाची भावना अधिक वाढली आहे. 

लॉकडाउनमध्ये मुलांमध्ये एकलकोंडेपणा वाढला आहे. चिडचिड आणि नैराश्‍यही वाढले आहे. मुलांना यापासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी मुलांना विशेष वेळ देणे गरजेचे आहे. त्यांच्यातील एकटेपणाची भावना काढणे गरजेचे आहे. -डॉ. जयंत ढाके, मानसोपचारतज्ज्ञ 

रिपोर्टर- गायत्री जेऊघाले

(संपादन - ज्योती देवरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT