ST BUS News esakal
नाशिक

ST Bus : 50 टक्के सवलतीमुळे खासगी वाहनातून महिला प्रवासी बेपत्ता? व्यवसाय बॅकफूटवर

गोकुळ खैरनार : सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शासनाने लालपरीच्या प्रवासातून सर्व वयोगटातील महिलांना तिकिटात ५० टक्के सूट दिली आहे. या निर्णयामुळे एसटीत आता महिला राज सुरु झाले आहे. प्रत्येक एसटीत जवळपास महिला प्रवासी संख्या वाढली आहे.

एसटीतील सवलतीमुळे महिला प्रवाशांनी खासगी वाहनांकडे पाठ फिरविली आहे. खासगी वाहनातून महिला प्रवासी जणू ‘बेपत्ता’ होत आहेत. या निर्णयाचा फटका खासगी वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात बसू लागला असून व्यावसायिक बॅकफूटवर आले आहेत. अनेक ठिकाणचे प्रवासी भाडे कमी केले जात आहे.

जिल्ह्यात सर्व तालुक्यात खासगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. जलद व तत्काळ वाहन मिळत असल्याने नागरिकही खासगी वाहनांकडे आकर्षित झाले आहेत. ग्रामीण भागात खेड्यापाड्यात रिक्षा धावतात.

जीप, टॅक्सी, ॲपेरिक्षा, क्रुझर, काळी-पिवळी, मारुती व्हॅन आदी वाहने लांब अंतरासाठी प्रवासी वाहतूक करतात. यातून हजारो जणांना रोजगार मिळाला आहे. त्यातच आता शासनाने एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिल्याने खासगी वाहन मालक व चालकांचे धाबे दणाणले आहे. यातील अनेकांचा व्यवसाय आठवड्यातच ३० ते ४० टक्क्यांनी घसरला आहे.

एसटीत विद्यार्थी, ६५ वर्षावरील व्यक्तींना आधीच सवलत दिली जात होती. ७५ वर्षावरील वृद्धांना मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे. आता सर्व वयोगटातील महिलांसाठी ५० टक्के सवलत देण्यात आल्याने ‘लालपरी’ हाऊसफुल्ल होऊन धावत आहे.

पदवीधर उमेदवार संकटात

कसमादेसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ॲपे रिक्षा मोठ्या प्रमाणावर धावतात. यात जादाकरुन पदवीधर उमेदवार हे मोठ्या संख्येने रिक्षा चालवितात. अनेकांनी दीड ते दोन लाख रुपये गुंतवून रिक्षा व्यवसाय सुरु केला. परंतु एसटीने महिलांना दिलेल्या ५० टक्के सवलतीमुळे ग्रामीण भागातील महिलांचा कल मोठ्या प्रमाणावर लालपरीतून प्रवासाकडे वाढला आहे.

याचा थेट परिणाम रिक्षा व्यवसायावर झाला आहे. रिक्षाची वाढती संख्या व एसटीच्या सवलतीमुळे ॲपेरिक्षाचालक संकटात सापडले आहेत. शासनाने रिक्षा व्यावसायिकांना वाऱ्यावर न सोडता त्यांना मदत करावी अशी अपेक्षा व्यावसायिकांकडून केली जात आहे.

क्रुझर मालक सांगतात...

''एसटीने महिलांसाठी दिलेल्या ५० टक्के सवलतीचा फटका सर्व प्रकारच्या खासगी वाहनधारकांना बसला आहे. महिला प्रवाशांची संख्या एकदमच कमी झाल्याने मिळेल तेवढ्या प्रवाशांवर वाहन चालवावे लागते. अनेकवेळा प्रवासाला लागणारे डिझेलदेखील सुटत नाही. खासगी वाहन मालक- चालक असंघटित कामगारांमध्ये येतात. शासनाने या घटकांसाठी ठोस उपाययोजना कराव्यात.'' - रवींद्र उशिरे, क्रुझर मालक, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT