Field fire due to short circuit
Field fire due to short circuit esakal
नाशिक

नाशिक : शॉर्टसर्किटमुळे शेताला आग; पंधरा एकर ऊस जळून खाक

विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शेणित येथील दहा शेतकऱ्यांचा तोडीस आलेला जवळपास एकूण पंधरा एकर ऊस शेतातील वीजतारांच्या शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना घडली. दहा एकर ऊस क्षेत्र वाचविण्यास यश आले. काही दिवसांपूर्वीच जवळच असलेल्या धामणगाव येथे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच ते दहा एकर ऊस जळून भस्मसात झाला होता.

इगतपुरी तालुक्यातील धामणगाव परिसरात विठ्ठल उगले, अशोक गाढवे, रामदास गाढवे, राजाराम गाढवे या शेतकऱ्यांचा विजेच्या लोंबकळत असलेल्या तारांमुळे लागलेल्या आगीत पाच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच इगतपुरी तालुक्यातील शेणित येथील शेतकरी विष्णू जाधव, बबन जाधव, त्र्यंबक जाधव, संतू जाधव, केरू जाधव, भगवान जाधव, कचरू जाधव व दत्तू शंकर जाधव या शेतकऱ्याचा जवळपास १५ एकर संपूर्ण तोडीस आलेला ऊस शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाल्याची घटना घडली असल्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त असून, परिसरातील लोंबकळत असलेल्या वीजवाहिन्या व जीर्ण झालेले विजेचे खांब यामुळेच शॉर्टसर्किट होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

आगीस वीज वितरण कंपनी जबाबदार असून, झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देऊन दिलासा द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात येथील शेतकरी यांनी पंचनामा करण्यासाठी वीज वितरणचे सहाय्यक अभियंता श्री. धोरणकर यांना दुरध्वनीवरून संपर्क साधला असता वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

''या भागात थोडासा वाऱ्याचा जोर असल्यामुळे वीजवाहिन्या एकमेकांना लागून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे शेणित येथील शेतकऱ्यांचा तोडीस आलेला जवळपास पंधरा एकर ऊस आगीत जळून खाक झाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले. अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये, यासाठी संबंधित विभागाने शेतकऱ्यांच्या शेतातील जुन्या वीजतारा व जीर्ण विजेचे खांब तत्काळ बदलावेत व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी.'' - विष्णू जाधव, शेतकरी, शेणित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT