Corona Vaccine Sakal
नाशिक

नाशिक : शहरात पावणेदोन लाख नागरिक लशीविना

हलगर्जीमुळे जिवाला धोका; जेमतेम ५५ टक्के नागरिकांचे लसीकरण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या वर्षभरापासून लसीकरण मोहीम सुरू असली, तरी अद्याप शहरातील पावणेदोन लाख नागरिक असे आहेत, की ते लस घेण्यासाठी आरोग्य केंद्राची पायरीदेखील चढले नाहीत. अशा लोकांना कोरोनाचा धोका अधिक असल्याने त्यात आता दक्षिण आफ्रिकेतील ‘ओमिक्रॉन’ या नव्या व्हेरिएंटची भीती अधिक दिसून येत आहे. दरम्यान, आतापर्यंत शहरात ५५ टक्के नागरिकांनी कोरोनाचा पहिला डोस घेतल्याचा अहवाल वैद्यकीय विभागाकडे प्राप्त झाला आहे.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेनंतर प्रशासनाने तिसऱ्या लाटेची जोरदार तयारी सुरू केली आहे. पहिल्या लाटेत शहरात ७६ हजार नागरिक कोरोनामुळे बाधित झाले होते. एक हजारापेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या लाटेत दीड लाखाहून अधिक नागरिक बाधित झाले व तीन हजारांहून अधिक नागरिकांचा बळी गेला. शहरात आतापर्यंत चार हजार ११ नागरिकांचा बळी गेला आहे. महापालिका हद्दीत २६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली. महापालिकेने १८ वर्षांवरील १३ लाख ६३ हजार नागरिक लसीकरणासाठी निश्‍चित केले होते. त्यांपैकी गेल्या ११ महिन्यांत ११ लाख ८७ हजार नागरिकांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. शहरात पावणेदोन लाख नागरिकांनी एकही डोस घेतलेला नाही.

पहिला डोस ५५ टक्क्यांवर

लसीकरणाचे डोस उपलब्ध होत नव्हते, त्या वेळी नागरिक पहाटेपासून केंद्रांवर गर्दी करत होते. आता मात्र मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होऊ लागली असताना नागरिकांनी लस घेण्याकडे पाठ फिरविली. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ११ लाख ८७ हजार, तर दुसरा डोस घेतलेले सात लाख ४८ हजार नागरिक आहेत. ९७ हजार लसवंत नागरिक असे आहेत, ज्यांनी पहिला डोस घेतला; परंतु दुसऱ्या डोसची ८४ दिवसांची मुदत उलटूनही अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही. दोन्ही डोस घेतलेले ५५ टक्के नागरिक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT