Girl Fighting Sakal
नाशिक

नाशिक : युवतींमध्ये फ्री-स्‍टाईल हाणामारी

गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर गुरुवारी (ता. ३०) सकाळी युवतींमध्ये फ्री-स्‍टाईल हाणामारी झाली.

सकाळ वृत्तसेवा

गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर गुरुवारी (ता. ३०) सकाळी युवतींमध्ये फ्री-स्‍टाईल हाणामारी झाली.

नाशिक - गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर गुरुवारी (ता. ३०) सकाळी युवतींमध्ये (Girls) फ्री-स्‍टाईल हाणामारी (Fighting) झाली. यासंदर्भातील व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाला. प्रियकराच्‍या (Lover) विषयावरून ही हाणामारी झाल्‍याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

यासंदर्भातील अधिक माहिती अशी : डोंगरे वसतिगृह मैदान परिसरात गुरुवारी सकाळी दोन युवती एकमेकांना भिडल्‍या. केस धरताना व बोचकत एकमेकांना जखमी केले. तेथेच उपस्‍थित असलेल्‍या अन्‍य काही युवतींनी मध्यस्थी करून भांडण सोडविले. दरम्‍यान, या घटनेवेळी तेथे उपस्‍थित काही अन्‍य युवकांनी या घटनेचा व्‍हिडिओ काढत सोशल मीडियावर व्‍हायरल केल्‍यानंतर या घटनेला वाचा फुटली. दरम्‍यान, प्रियकराच्‍या विषयावरून ही हाणामारी झाल्‍याचा प्राथमिक अंदाज प्रत्‍यक्षदर्शीकडून वर्तविला जात आहे.

महाविद्यालयाकडून समज

संबंधित युवती बारावीच्या विद्यार्थिनी आहेत. घटनेचा व्‍हिडिओ महाविद्यालय प्रशासनापर्यंत पोचला. यानंतर पालकांसह संबंधित विद्यार्थिनींना महाविद्यालयात बोलविण्यात आले. यापैकी एक विद्यार्थिनीने भ्रमणध्वनी स्‍वीच ऑफ करत पसार झाल्‍याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. दरम्‍यान, दोन्‍ही युवती मैत्रिणी असून, त्‍यांचे कौटुंबिक पातळीवरही घनिष्ठ संबंध असल्‍याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. या घटनेविषयी संबंधितांना समज दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

Piyush Goyal : पावभाजीची चव रोबोट देऊ शकणार नाही; वैभव सूर्यवंशीसारखा सिक्सरही नाही! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा आणि भारतातील संशोधनाच्या संधींवर पियुष गोयल यांची मांडणी

Pune News : औषधाच्या गोळीतून ब्लेडचे तुकडे खायला दिले; पतीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, पत्नी फितूर होऊनही वैद्यकीय पुराव्यांवर निकाल

Share Market: ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंला SEBIचा दणका! 546 कोटी परत करण्याचे आदेश, 67 कोटी व्याज अन् 11.5 कोटींचा दंडही भरावा लागणार

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT