crime esakal
नाशिक

भावजयीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोघा दीरांवर गुन्हा

विनोद बेदरकर

मालेगाव (जि.नाशिक) : शेतजमिनीच्या वाटपावरून सतत होणाऱ्या वादातून विवाहितेने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील गरबड येथे घडली. या प्रकरणी दोघा दिरांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीर व जेठ यांच्याशी शेती वाटे हिस्स्यातून सातत्याने वाद होत. यातच गोपीनाथ शिवराम जाधव यांच्या कुत्र्याला त्यांचा भाऊ लहू शिवराम जाधव व पत्नी सताबाई जाधव यांनी दगड मारला. या वादातून दोघा कुटुंबीयांमध्ये पुन्हा भांडण झाले. ७ ऑगस्टला हा प्रकार घडला.

यापूर्वीही दोघा कुटुंबीयांमध्ये वाद होतच होते. या वादाला कंटाळून सताबाई लहू जाधव (वय ४२) हिने स्वतःच्या घरासमोरील झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत सताबाईचा पती लहू शिवराम जाधव (वय ४५, रा. गरबड) यांनी याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गोपीनाथ जाधवसह चौघांनी त्यांची पत्नी सताबाई हिला मारहाण, शिवीगाळ व दमबाजी केली होती. यानंतरच तिने आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रार दाखल होताच उपअधीक्षक शशिकांत शिंदे, सहाय्यक निरीक्षक आर. डी. मातोळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहाणी, पंचनामा केला. ८ ऑगस्टला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. लहू जाधव यांनी तक्रार दिल्यानंतर १० ऑगस्टला त्यांचे बंधू गोपीनाथ शिवराम जाधव, विलास शिवराम जाधव, सखूबाई गोपीनाथ जाधव व गुलाब गोपीनाथ जाधव (सर्व रा. गरबड) या चौघांविरुद्ध विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. जमादार राऊत तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : भिडे पुलाजवळ तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, शरीरावर धारदार शस्त्राचे वार अन् दगडाने ठेचलेलं; काय घडलं?

Sangli firing incident : सांगलीच्या राममंदिर चौकात गोळीबारचा थरार; मुलाच्या वाढदिवसाला न येण्याच कारण, मित्रानेच मित्राला घातली गोळी अन्...

SRH चे फॅन्स स्टेडियममध्ये 'लिंबू' घेऊन आले... शिवम दुबेच्या विकेटसाठी बघा काय केलं? गमतीशीर Video Viral

MPSC Success Story: हारविक्रेत्याच्या मुलाने फुलवले आयुष्य; नीऱ्याचा रूपेश कांबळे बनला राजपत्रित अधिकारी, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची परतफेड!

बँक ऑफ महाराष्ट्रवर दरोडा, १० मिनिटात १५ कोटींचं सोनं अन् २० लाखांची रोकड लुटली; सूत्रधाराला अटक, इतरांचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT