hospital cctv.jpg
hospital cctv.jpg 
नाशिक

"माझ्या पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत 'त्या' डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा"...पतीचे मनपा आयुक्तांना पत्र

प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक / सिडको : हॉस्पिटल मधील हलगर्जीपणामुळे पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीचे पत्र पतीने मनपा आयुक्तांना दिले आहे. म्हटलयं की...

पत्रात पतीने म्हटलयं की...

हॉस्पिटल मधील हलगर्जीपणामुळे पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीचे पत्र पती प्रभाकर वकरे यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे. निवेदनाचा आशय पुढील प्रमाणे, 30 जुलै रोजी रात्री 2.00 वा. मीना प्रभाकर वकरे यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे व श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे सिडकोतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सदर रुग्णालयाने एक लाख रुपये अनामत भरल्याशिवाय दाखल करुन घेण्यास नकार दिला होता. एक लाख रुपयांची अनामत भरल्यानंतर रुग्णालयाने पत्नीला अतिदक्षता विभागात दाखल करून घेतले. तथापी अतिदक्षता विभागात असताना देखील रुग्णाला योग्य सेवा प्रदान न करता तसेच रुग्णांचे कोविड 19 चे निदान नकारात्मक आलेले असतानाही त्यावरचे उपचार करण्यात आले. परिणामी मुळ रक्त शर्करेचे प्रमाण वाढलेले असतानाही त्यावर उपचार न केल्याने उपचारा अभावी पत्नीचे 31 जुलै रोजी निधन झाले. रुग्णालयाने पत्नीच्या उपचाराबाबत अक्षम्य हलगर्जीपणा दाखविल्याने त्या अनुशंगाने सदर रुग्णालय व रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टराव कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे मनपा आयुक्तांना करण्यात आली आहे. 

निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे
पैसे अभावी उपचार करण्यास नाकारणे, कोविड असल्याची खात्री न करता त्यावर उपचार करणे व मूळ आजारावर उपचार न करणे, अतिदक्षता विभागात दाखल असतांनाही रुग्णाला स्वत : पाणी घेण्यास सांगण्यात आले आहे, कोविडचा अहवाल नकारात्मक आलेला असतानाही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता परस्पर अंत्यविधीसाठी मनपाच्या ताब्यात देणेत आला, अंगावरील दागीन्याचे रुग्णालयाने काय केले, कोवीडचा रिपोर्ट रुग्णालयामार्फत देण्यात आलेला नाही, सी सी टी व्ही फुटेज तपासावे, मृत्यु होवून 5 दिवस होवूनही रुग्णाचे वैद्यकीय कागदपत्रे व अनामतीचे पैसे हे अद्यापपावतो देण्यात आलेले नाही. तसेच मृत्यु झाल्यानंतर सुमारे 5 ते 6 तासांनी मृत्यु झाल्याची बाब कळविण्यात आली.

रिपोर्ट - प्रमोद दंडगव्हाळ

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT