company 123.jpg 
नाशिक

तब्बल ४४ कामगारांना कोरोना होण्यामागे कंपनीचा 'तो' हलगर्जीपणाच कारणीभूत..इतर कंपन्यांचेही धाबे दणाणले! 

संदीप मोगल

नाशिक / लखमापूर : एका औषधनिर्मिती कंपनीत २४ जुलैला एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पोलिस यंत्रणा यांनी कंपनी व्यवस्थापनाला सूचना दिली होती. मात्र सूचना देऊनही कंपनी व्यवस्थापनाने कामकाज सुरूच ठेवले होते. यादरम्यान कंपनी बसने कर्मचारी येथून नाशिकला ये- जा करतच होते. वाचा सविस्तर प्रकार..

...तरीही कर्मचारी येथून नाशिकला ये- जा करतच होते

एमआयडीसीतील एका कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याबद्दल पोलिस, महसूल प्रशासनाचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे हलगर्जी करणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील सर्वच कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. पालखेड एमआयडीसीमधील एका औषधनिर्मिती कंपनीत २४ जुलैला एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पोलिस यंत्रणा यांनी कंपनी व्यवस्थापनाला सूचना दिली होती. मात्र सूचना देऊनही कंपनी व्यवस्थापनाने कामकाज सुरूच ठेवले होते. यादरम्यान कंपनी बसने कर्मचारी येथून नाशिकला ये- जा करतच होते. 
कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या बसमध्ये तसेच प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन केले नाही. कंपनीचे उत्पादन वाढवण्यासाठी कामगार सतत काम करत राहिले आणि याचा परिणाम म्हणजे कंपनीतील ४४ कामगार कोरोनाबाधित झाले.

कंपनी व्यवस्थापन जबाबदार

कोरोनादरम्यान शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत संक्रमण वाढण्यास कंपनी व्यवस्थापनास जबाबदार धरण्यात आले. यावरून व्यवस्थापक राजेंद्र रसाळ, प्रवीण भोळे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी जबाबदार व्यवस्थापनाविरोधात साथरोग प्रतिबंध, कोविड- १९ उपाययोजना, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी फिर्याद दिली आहे. 

पालखेड औद्योगिक वसाहतीत खळबळ 
कोविडसंदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालखेड एमआयडीसीमधील या कंपनीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर या वसाहतीतील इतर कंपन्यांचे धागे दणाणले आहेत. लखमापूर फाटा येथील एका कंपनीत ४७ कामगारदेखील व्यवस्थापणाच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाबाधित झाले आहेत. त्यात वाहतूक करताना वाहनचालकांकडून कुठलीच खबरदारी घेतली जात नसल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीत कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आणखी वाढली आहे. यामुळे औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या व्यवस्थापनाविरोधातही गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे. 

रिपोर्ट - संदीप मोगल

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

AirPods 5 India Price: 5 तासांची बॅटरी अन् वायरलेस चार्जिंग! Appleने लाँच केले सर्वात स्वस्त ANC इयरबड्स; पहा खास फीचर्स...

Marathi News Live Updates : मुंबईला जाणारच, १२ तारखेला घोषणा करणार - मनोज जरांगे पाटील

SCROLL FOR NEXT