malegaon baricades.jpg 
नाशिक

धक्कादायक! "आम्हाला खरेदीला तिकडे जाऊ द्या" असे म्हणत युवकांनी पुलावरील बॅरिकेडिंग तोडले..अन् मग...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव :  जमाव अल्लामा एक्‍बाल पुलाकडे चाल करून गेला. त्यांनी कंटेन्मेंट क्षेत्रात जीवनावश्‍यक वस्तू नाही, आम्हाला खरेदीला तिकडे जाऊ द्या, असे म्हणत पुलावरील बॅरिकेडिंग तोडले. पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न करीत खुर्च्यांची तोडफोड केली. टाकाऊ वस्तूंची फेकाफेक सुरू केली. अन् मग...

आम्हाला खरेदीला तिकडे जाऊ द्या, म्हणत पुलावरील बॅरिकेडिंग तोडले.

अय्युबी खैबान निशांत चौकात वस्तू खरेदीच्या वादातून पोलिसांशी हुज्जत घातली. सूचना देणारा माईक हिसकावून घेत गोंधळ घातल्याबद्दल अकील कसाई, शहजाद अहमद आदींसह सुमारे शंभर जणांविरुद्ध उपनिरीक्षक विजय गोपाळ यांच्या तक्रारीवरून किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील काही जमाव अल्लामा एक्‍बाल पुलाकडे चाल करून गेला. त्यांनी कंटेन्मेंट क्षेत्रात जीवनावश्‍यक वस्तू नाही, आम्हाला खरेदीला तिकडे जाऊ द्या, असे म्हणत पुलावरील बॅरिकेडिंग तोडले. पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न करीत खुर्च्यांची तोडफोड केली. टाकाऊ वस्तूंची फेकाफेक सुरू केली. याप्रकरणी पोलिस शिपाई शांतिलाल जगताप यांच्या तक्रारीवरून 30 अनोळखींविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही ठिकाणी आलेल्या जमावातील बहुसंख्य जणांनी मास्क घातलेले नव्हते. 

50 जणांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल

मालेगाव शहरातील अल्लमा एक्‍बाल पूल व अय्युबी चौकातील गुरुवारी (ता. 23) झालेल्या गोंधळ, धक्काबुक्की व तोडफोडप्रकरणी अकील कसाई, शहजाद अहमद आदींसह सुमारे 50 जणांविरुद्ध छावणी व किल्ला पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, या प्रकारानंतर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. त्यांची गय करू नका, अशा सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: महावीर जयंतीला बँका सुरू राहणार की नाही? बँका सलग दोन दिवस बंद? RBI काय सांगते

"चालू सीनमध्ये आमच्या नाटकाचं पोस्टर दिसत होतं" प्रियाने सांगितली नव्या वेबसीरिजच्या मेकिंगची आठवण

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो चालकांचा मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मोर्चा

Mahur News : माहूर मध्ये ‘गैरहजर’ कर्मचाऱ्यांची ‘पंचायत’; गट विकास अधिकाऱ्यांकडून १३ कर्मचाऱ्यांना शो कॉज

Junnar Crop Damage: जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस व लिंबाएवढ्या गारांचा कहर; द्राक्ष, कांदा, टोमॅटो, आंबा पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT