NMC esakal
नाशिक

NMC News : थकबाकीदार गाळेधारकांना अंतिम नोटिसा; गाळे होणार सील!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंधराव्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त करण्यासाठी महापालिकेने थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक हजार २०२ गाळेधारकांकडून ४२ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी या गाळेधारकांना अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या असून थकबाकी अदा न केल्यास गाळे सील केले जाणार आहे. (Final notices to arrears holders shops will sealed Nashik NMC News)

केंद्र सरकारकडून १५ व्या वित्त आयोगाचा निधी हवा असल्यास त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्यांबरोबरच थकबाकी वसूल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्याअनुषंगाने नाशिक महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे.

सध्या उत्पन्नात जवळपास साडेचारशे कोटी रुपयांची तूट असून, ती तूट पाचशे कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे. त्यामुळे घरपट्टी व पाणीपट्टीच्या थकबाकीदारांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. आता कारवाईचा मोर्चा गाळेधारकांकडे वळविण्यात आला आहे.

शहरात महापालिकेचे ६२ व्यापारी संकुल आहे. या व्यापारी संकुलामध्ये जवळपास २०९३ गाळेधारक आहेत. यातील १२०२ गाळेधारक महापालिकेचे थकबाकीदार असून, त्यांच्याकडून ४२ कोटी रुपयांची वसुली करणे क्रमप्राप्त आहे.

त्यासाठी महापालिकेने आशा गाळेधारकांकडून वसुली करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या सर्व गाळेधारकांना अंतिम नोटीस बजावण्यात आली असून, सात दिवस थकबाकी भरण्यासाठी देण्यात आली आहे. अशी माहिती विविध कर उपायुक्त अर्चना तांबे यांनी दिली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

एका नोडल अधिकाऱ्याकडे १५ पथके

१२०२ थकबाकीदार गाळेधारकांकडून ४२ कोटी रुपये वसूल केले जाणार आहे वसुलीसाठी सहा विभागीय अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एका नोडल अधिकाऱ्याकडे १५ पथके राहणार असून त्या पथकात तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे सोमवारपासून पथकामार्फत काम सुरू होईल. गाळेधारकांकडे जाऊन थकबाकी वसुलीची मागणी केली जाईल. तत्काळ थकबाकी न भरल्यास गाळे सील केले जाणार आहे

महापालिकेची दुसरी मोठी कारवाई

महापालिकेच्या गाळ्यांमध्ये पोट भाडेकरू नेमून त्यांच्याकडून भाडे वसुलीचा धंदा यापूर्वी होता. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत मोहीम राबवून पोट भाडेकरूंचे धंदे उघड केले होते.

त्यानंतर गेडाम यांनी रेडीरेकनर दराप्रमाणे गाळ्यांना भाडे आकारण्याचा निर्णय घेतला. परंतु स्थायी समितीने दरवाढीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर गाळेधारकांची न्यायालयीन लढाई सुरू झाली. आता १२०२ गाळे सील करण्याची दुसरी मोठी कारवाई ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: बाणेर-बालेवाडीतील मेट्रो स्थानकांना डावलल्याने नागरिक रस्त्यावर; मेट्रो सुरू करण्यास विरोध, आंदोलनकर्ते ताब्यात

IND vs NZ : विराट कोहली न्यूझीलंडमध्ये सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडणार? सेहवागलाही मागे टाकण्याची संधी

Koyna Dam Water Release : कोयनेच्या विसर्गाने वाहू लागली 'कृष्णा'; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत

Latest Marathi News Live Update : पुण्यातील वाहतूक कोंडी 4 वर्षांत कमी होणार, देवेंद्र फडणवीस

Gangapur Drought: दुष्काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये; कृषी आयुक्तांनी थेट शेतात जाऊन आखले नियोजन!

SCROLL FOR NEXT