talwade panchnama 1.jpg 
नाशिक

अखेर त्या कोबी पिकाचा कृषी विभागातर्फे पंचनामा 

सकाळवृत्तसेवा

नाशिक/ तळवाडे दिगर  : वडेल येथील कृषी विज्ञान केंद्राचे संशोधक पवन चौधरी यांनी शेतात कोबी रोपांची उगवण फक्त पाच ते दहा टक्के झाल्याचे मत व्यक्त केले. त्यानंतर कृषीअधिकाऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे केले.शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केलेल्या बिलाच्या पावत्या, लॉटनंबर देखील घेण्यात आले. 


यावेळी तालुका कृषीधिकारी सुधाकर पवार, पंचायत समिती कृषीधिकारी प्रणय हिरे, कंपनी प्रतिनिधी नितीन लवांडे, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य पंकज ठाकरे,प्रहार शेतकरी संघटनेचे उपतालुकाध्यक्ष गणेश काकुळते,शेतकरी देविदास पवार,सोपान अहिरे,युवराज देवरे,नरेंद्र आहिरे,शांताराम ठाकरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

बागलाण तालुक्‍यात गेल्या सात ते आठ दिवसात ऍडव्हानटा कंपनीच्या युरो 2 या व्हरायटीचे 12 ते 14 शेतकऱ्यांच्या बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी होत्या. आज आम्ही तक्रार संबंधी पाहणी करून पंचनामा केला. बियाणे कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल. संबंधित कंपनीकडून या लॉटचे नमुने घेऊन बीज पर्यवेक्षण प्रयोगशाळेत पाठवून निष्कर्षानंतर पुढील कार्यवाही दोषींवर केली जाईल. 
सुधाकर पवार, तालुका कृषी अधिकारी बागलाण 

1 जून रोजी पंधरा हजाराचे कोबी बियाणे टाकले होते. मात्र दहा दिवस उलटूनही बियाणे उगले नाही. विक्रेता तसेच कंपनीशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली मात्र सकाळ मध्ये वृत्त छापून येतात कंपनी प्रतिनिधी शेतात हजर झाले. त्याबद्दल सकाळचे आभार मानतो. 
देविदास पवार,शेतकरी, तळवाडे दिगर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

MI vs KKR Toss Fixing? मुंबई इंडियन्सवर 'फिक्सिंग'चा आरोप, टॉसच्या वेळी हार्दिकने काय केले पाहा; नेटकऱ्यांनी घेतली शाळा Video Viral

खरातचा सीए माफीचा साक्षीदार बनणार? खरातविरोधातच दिलीय तक्रार, शेकडो कोटी परदेशात पाठवले, कोण आहे ललित पोफळे?

Pune Palkhi halt change: पुण्यातील भवानी पेठेतील पालखी मुक्काम बदलण्याचा विचार; अंतिम निर्णय १३ एप्रिलला जाहीर होणार

Mohol Teachers Felicitation: मोहोळ तालुक्यातील १९ शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; उद्या श्रीक्षेत्र वडवळ येथे मान्यवरांच्या हस्ते वितरण

SCROLL FOR NEXT