Disabled Person News esakal
नाशिक

NMC News: स्पर्धा परिक्षेसाठी दिव्यांगांना अर्थसाहाय्य; महापालिका समाजकल्याण विभागाकडून कल्याणकारी योजना

सकाळ वृत्तसेवा

NMC News : महापालिकेकडून दिव्यांगांसाठी आता एमपीएससी व यूपीएससी परीक्षांचे दारे खुली करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. पूर्व परिक्षा व मुख्य परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ हजार ते एक लाख रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाणार आहे.

सध्या समाजकल्याण विभागाकडून दिव्यांगांसाठी दहा कल्याणकारी योजना राबविल्या जातात. (Financial assistance to disabled for competitive exams Welfare Scheme from Municipal Social Welfare Department nashik)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या दिव्यांगांना अर्थसाहाय्यकरिता महापालिकेच्या समाजकल्याण विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात.

यात कर्णबधिर शस्त्रक्रिया अर्थसाहाय्य, दिव्यांग स्वयंरोजगार अर्थसाहाय्य, प्रौढ बेरोजगार दिव्यांग अर्थसाहाय्य, दिव्यांग विद्यार्थी पालक प्रशिक्षण अर्थसाहाय्य,

दिव्यांग शिष्यवृत्ती व व्यवसाय प्रशिक्षण अर्थसाहाय्य, दिव्यांग सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान अर्थसाहाय्य, विशिष्ट गरजेच्या दिव्यांगांना अर्थसाहाय्य व दिव्यांग क्षेत्रातील संस्था, संघटनांच्या सक्षमीकरण, मतीमंद, मेंदूपीडित तसेच बहुविकलांग दिव्यांगांना अर्थसाहाय्य, दिव्यांग खेळाडू ज्यांना विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष प्रावीण्य मिळाले आहे.

किंवा परदेशात होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांकरिता सहभाग नोंदविण्याची इच्छा असलेल्या दिव्यांगांकरीता अर्थसाहाय्य, शिष्यवृत्ती योजनांचा समावेश आहे. आता महाराष्ट्र राज्यसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्या दिव्यांगांना ५० हजाराचे अर्थसाहाय्याची भर पडली आहे.

मुख्य परिक्षा उत्तीर्ण झालेल्या दिव्यांगांना एक लाख रुपये अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्या दिव्यांगांना २५ हजार रुपये, तर मुख्य परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्यास ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.

अशी माहिती समाजकल्याण विभागाचे उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली. परिक्षेत निवड झाल्याचे गुणपत्रक, परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तीन महिन्यात अर्ज करावा, एकाच परिक्षेसाठी योजनेचा लाभ, कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा चार लाखांपर्यंत मर्यादित, उद्योग व व्यवसाय करत नसल्याचे प्रतिज्ञापत्र आदी कागदपत्रे सादर करावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT