suicide dnyaneshawar.jpg 
नाशिक

सोसायटीचे कर्ज..लहान बहिणीचे लग्न..लहान वयातच जबाबदारीचं ओझं..एका भावाची नशिबाशी झुंज अपयशी..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / वणी : वडील यांचा अपघात होऊन पाय मोडलेला आहे. त्याची आई आजाराने त्रस्त.. त्यांच्यावर सोसायटीचे नऊ लाख रुपये व ऍक्‍सिस बॅंकेचे 35 लाख रुपये कर्ज... लहान बहिणीचे लग्न बाकी.. व घरची सर्व जबाबदारी अंगावर..अशातच तो जीवनाशी झुंज देत होता..पण... 

लहान वयातच जबाबदारी..त्यात आर्थिक विवंचना..

कोशिंबे (ता. दिंडोरी) येथील तरुणाने विष घेऊन आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. ज्ञानेश्‍वर राजाराम जाधव (वय 22) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याने राहत्या घराजवळील शेतात रविवारी रात्री काहीतरी विषारी पदार्थ सेवन केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. वणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

नशीबाशी हार मानली...

ज्ञानेश्‍वरचे वडील राजाराम बाळासाहेब जाधव यांचा अपघात होऊन पाय मोडलेला आहे. त्याच्या आई सुनंदा (वय 44) आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्यावर राजापूर सोसायटीचे नऊ लाख रुपये व ऍक्‍सिस बॅंकेचे 35 लाख रुपये कर्ज असल्याची माहिती आहे. लहान बहिणीचे लग्न बाकी असल्याने व घरची सर्व जबाबदारी अंगावर पडल्याने त्या आर्थिक विवंचनेतून ज्ञानेश्‍वरने 
आत्महत्या केल्याचे बोलले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT