Ramzan Eid
Ramzan Eid esakal
नाशिक

Ramzan : जकातमधून दुर्बल घटक, संस्था, मदरशांना मोलाचे सहाय्य

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : रमजान काळात दान, धर्म, सेवा, प्रार्थना याला अनन्य साधारण महत्व दिले जाते. या काळात बहुसंख्य मुस्लिम बांधव (Muslim Brotherhood) पाचही वेळची नमाज (Namaaz) पठण करतात. धार्मिक पुस्तके (Religious Books) व साहित्याची मोठी विक्री होते. रमजानमध्ये (Ramzan Eid) सधन व दानशुर मुस्लिम बांधव आपल्या वार्षिक उत्पन्नातील अडीच टक्के रक्कम जकात म्हणून दान स्वरुपात वाटप करतात. धर्मगुरुंच्या (Maulana) म्हणण्यानुसार साडेबावन्न तोळ्यापेक्षा जास्त चांदी ज्या व्यक्तीकडे असेल त्याने प्रत्येकाने जकात वाटप केली पाहिजे. या माध्यमातून दरवर्षी समाजातील दुर्बल घटकांना, संस्था, मदरसे, विधवा, परिपक्त्या, अनाथ, आजारी यासह समाजातील विविध घटकांना कोट्यावधी रुपयांची मदत वाटप होते. जकातीचे दान गुप्त ठेवले जाते.

मुस्लिम बहुसंख्याक असलेल्या मालेगाव शहरातील धनीक मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणावर जकात वाटप करतात. शहरात शब्बे बारातला बॉम्ब स्फोट झाल्यापासून परराज्यातील व परगावाहून येणाऱ्या भिकाऱ्यांना बंदी घालण्यात आलेली आहे. यामुळे शब- ए- बारातला वाटप होणाऱ्या खैरातीवर परिणाम झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर रमजानमध्ये मोठ्या प्रमाणावर जकात वाटप करण्याची प्रथा सुरु झाली आहे. शहरातील काही मुस्लीम बांधव, राजकीय नेते, कार्यकर्ते, नगरसेवक गरीब मुस्लिम बांधव व कार्यकर्त्यांना कपडे, वाटप करतात. या काळात कपड्यांची विक्रमी विक्री होते. काही नेते थेट मुंबई, सुरत येथून सुटींग, शर्टींगचे शेकडो कार्टुन खरेदी करुन येथे गरीबांना मोफत कपडे वाटप करतात. येथील जकातीची प्रचिती ऐकूण उत्तरप्रदेशसह परराज्यातील विविध धार्मिक संस्था, संघटना व मदरशांचे प्रतिनिधी शहरात जकात मिळविण्यासाठी येतात. या वेळी आमदार मौलाना मुफ्ती व त्यांच्या सहकाऱ्यांनी जकातीच्या नावाने पैसे उकळणाऱ्या काही बोगस प्रतिनिधींना रंगेहाथ पकडले.

रमजानची जकात सार्थकी लागावी असा प्रत्येकाचा हेतू असतो. शहरात दोन बोगस प्रतिनिधी मिळून आल्यानंतर जकात वाटप करणारे मुस्लिम बांधवही सगज झाले आहेत. अनोळखी संस्था, संघटनेला वा व्यक्तीला दानधर्म करण्याऐवजी परिचयातील संस्था, संघटना, मदरसा अथवा नात्यातीलच गरीब नातेवाईकांना जकात वाटप केली आहे. जकात वाटप करताना जात, धर्म, पंथ पाहिला जात नाही. शहर व परिसरातील अनेक मदरसे जकातीच्या माध्यमातून मिळणारी एकरक्कमी मदत व दानशुरांच्या सहकार्यानेच सुरु आहेत.

रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर मराठवाड्यातील जालना, बुलढाणा येथील मुस्लीम बांधव तसेच समस्त मुस्लिम समाज महाराष्ट्र, टिपू सुलतान ब्रिगेड या संस्था, संघटनांनी जकात व गरजुंना मदतीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. या अभियानात राज्यातील एक लाख गरजू लोकांना अन्नधान्याचे किट वाटप करण्याचे नियोजन टिपू सुलतान ब्रिगेडने केले आहे. या बरोबरच राज्यातील मुस्लीम बांधवांनी गरजू आदिवासी, दलित, बंजारा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची अनाथ मुले, गाव, खेडे, जंगल पाड्यातील शोषित, पिडीत बहुजन बांधवांना सहाय्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संकटकाळात या संस्थांनी धान्यवाटप उपक्रम यशस्वीपणे राबविला होता. त्याचा अनुभव गाठीशी असल्याने हे अभियान यशस्वीपणे राबवून जास्तीत जास्त दुर्बल घटक कुटुंब व शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचविण्याचा मनोदय संबंधितांनी व्यक्त केला आहे. रमजानमधील जकातच्या मदतीतून असे विधायक स्वरुपाचे कायमस्वरुपी प्रकल्प व उपक्रम आकाराला आल्यास हिंदू- मुस्लिम ऐक्य व राष्ट्रीय एकात्मता वाढीसही हातभार लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT