the kerala story esakal
नाशिक

BJP Kerala Story Sponsor : ‘दि केरला स्टोरी’ साठी भाजपवर स्पॉन्सर शोधण्याची वेळ! निवडणुकांचा परिणाम

खर्चाच्या भीतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांची चालढकल

सकाळ वृत्तसेवा

BJP Kerala Story Sponsor : केंद्र, राज्य व महापालिकेत सत्ता असताना ‘दि काश्मीर फाइल' चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद व चित्रपट मोफत दाखवण्यासाठी पुढे आलेले स्पॉन्सर आता ‘दि केरला स्टोरी’ या चित्रपटासाठी पुढे येत नसल्याने शहरात भाजपची अडचण झाली आहे.

महापालिका निवडणुका झाल्या नाही व भविष्यात कधी निवडणूक होतील, याचीदेखील शाश्वती नाही. त्यामुळे आत्ताच खिशाला झळ बसण्यापेक्षा अनेकांनी चित्रपट स्पॉन्सर करण्यापासून माघार घेतल्याचे बोलले जात आहे. (find sponsor on BJP for The Kerala Story movie Results of elections nashik political news)

काश्मीरमधील पंडितांवर होणाऱ्या अन्यायाच्या व्यथा ‘काश्मीर फाइल’ या चित्रपटातून मांडण्यात आल्या आहेत. सदर चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील झळकला आहे. त्यापूर्वी संपूर्ण देशभरात मोठ्या स्क्रीनवर हा चित्रपट झळकला.

नाशिकमध्येदेखील मोठ्या स्क्रीनवर चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचून काश्मीरमधील मुस्लिम संघटनांकडून कशाप्रकारे हिंदूंवर अन्याय अत्याचार झाले.

याची माहिती चित्रपटाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी भाजपने आटोकाट प्रयत्न केले. नाशिकमध्ये त्यासाठी स्पॉन्सर शोधण्यात आले होते. चित्रपटगृहांमध्ये मोफत चित्रपट दाखवण्यात आल्याने गर्दीदेखील झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याच धर्तीवर आता दि केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दि केरला स्टोरी हा चित्रपट नागरिकांना मोफत दाखविण्यासाठीदेखील तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु काश्मीर फाइल चित्रपट दाखवला गेला.

त्या वेळी भाजपची सत्ता होती. आता मात्र निवडणुका झालेल्या नाहीत व भविष्यात निवडणुका कधी होतील याची शाश्वती नाही. त्यामुळे आत्ताच खर्च परवडणार नसल्याने अनेकांनी स्पॉन्सर होण्याकडे पाठ फिरविण्यात आल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानात SEX वर अप्रत्यक्ष निर्बंध? Condom वरील GST रद्द करण्याची मागणी फेटाळली, IMF च्या एका निर्णयाने सगळं बदललं!

'भरधाव दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू'; सांगाेला तालुक्यातील घटना, दुचाकीच्या मागे बसल्या हाेत्या अन् काय घडलं..

Latest Marathi News Live Update : महापालिकेसाठी भाजपची आज रणनीती ठरणार; निवडणूकसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील घेणार कोअर कमिटीची बैठक

Ambulance Service : १०८ रुग्णवाहिकेद्वारे राज्यातील सव्वा कोटी रुग्णांना सेवा

Solapur News: पंढरपूरच्या श्री विठ्ठलमूर्तीच्या चरणांची झीज; पुरातत्त्व विभागाचा अहवाल, लवकरच रासायनिक प्रक्रिया..

SCROLL FOR NEXT