vehicle esakal
नाशिक

तुमच्या वाहनांवर हजारो रुपयांचा दंड तर नाही ना...?

एस.डी.आहीरे

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : डिजिटल क्रांतीमुळे पोलिस व परिवहन विभागामार्फत नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनांविरोधात ई- चालानद्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, अनेक वाहनधारकांना कारवाईच्या माहितीचा संदेश मोबाईलवर प्राप्त होत नाही. त्यातून वाहनांवर हजारो रुपयांचा दंड साचतो आणि मग एकाच वेळी ही रक्कम भरण्याची वेळ येते. यातून वाहनधारकांना मनस्तापाची वेळ येते. यामुळे आरटीओ किंवा पोलिस अधिकाऱ्यांशी नागरिकांचे खटके, बाचाबाचीचे प्रसंग उद्भवत आहेत.

ई-चालानचा दणका; परिवहन विभागाकडे मोबाईल क्रमांक नोंदविणे आवश्‍यक

परिवहन कार्यालयाकडून वाहनांची नोंदणी करताना त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक घेतला जातो. ई-चालानच्या माध्यमातून झालेली कारवाईची माहिती त्या वाहनधारकांना मोबाईलवर संदेशाद्वारे पाठविला जातो. मात्र, बहुतांश वेळेला वाहनधारकांना कारवाई केल्याच्या एसएमएस प्राप्त होत नाही. वाहतूक नियमांचा भंग होतो, तेव्हा ई-चालान त्या वाहनाच्या नावावर पडते. ही करावाई वेगवेगळी आणि हजारो रुपयांत असू शकते.

त्यानंतर वाहन पकडले जाते, त्यावेळी ई- चालान मशीनवर वाहनांचा नंबर टाकताच त्या वाहनांवर असलेला दंड शंभर रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत साचलेला दिसतो. अशावेळी पूर्ण दंड भरल्याशिवाय सुटका नसल्याने वाहनचालकांच्या पाचावर धारण बसते. वाहनावरील दंड वाढत असल्यास त्याच्या नोंदणीकृत पत्त्यावर माहिती पाठविली, तरी पुढील मनस्ताप व संघर्ष टळू शकतो.

काय करायला हवे...

वाहन खरेदीवेळी परिवहन विभागाकडे अद्ययावत मोबाईल क्रमांक नोंदविणे आवश्‍यक आहे. मोबाईल क्रमांक आरटीओकडे अपडेट नसेल तर दंडाच्या कारवाईचा संदेश मिळत नाही व हजारो रुपयांचा दंडाचा डोंगर वाहनाच्या माथी साचतो. हे टाळण्यासाठी परिवहन कार्यालयाकडे मोबाईल क्रमांक अपडेट करणे आवश्‍यक आहे.

काय आहे तंत्रज्ञान...

वाहनधारकांवर नजर ठेवण्यासाठी नाशिक शहर व मुंबई- आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी पोलिस गस्त घालतात. काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. याद्वारे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. पळ काढणाऱ्या वाहनांचे फोटो मोबाईलमध्ये काढून पोलिस ते सर्व्हेरला कारवाईसाठी पाठविले जातात. महामार्गावर साकोरे फाटा, आडगाव आदी ठिकाणी अती वेगाने धावणाऱ्या वाहनांना दंड ठोठावण्यासाठी स्पीडगन ट्रॅकर लावले आहेत. त्यामुळे नजरचुकीने किंवा घाईघाईत नियम पायदळी तुडविले असतील व त्यातून पोलिसांनी ई-चालानची कारवाई केली असेल तर खात्री करायला हवी, अन्यथा तुमच्या वाहंनावर हजारो रुपयांचा दंड राहील व ऐनवेळी तो चुकता करण्याचा बाका प्रसंग उभा राहू शकतो.

ई-चालानद्वारे झालेल्या कारवाईतून वाहनधारकांना अचानक हजारो रुपयांचा दंड भरण्यास सांगितले जाते. मोबाईल क्रमांक अपडेट असूनही कारवाईचा संदेश मिळत नाही. दंड वाढत गेला, तर तसे सूचित करणारे पत्र वाहनधारकांच्या पत्‍त्यावर पाठविणे आवश्‍यक आहे. त्यातून नागरिकांचा मनस्ताप टळेल. परिवहन विभागाकडून पाठविले जाणारी एसएमएस यंत्रणा सदोष असून, त्यात सुधारणा न केल्यास मनसेतर्फे आंदोलन छेडले जाईल. -प्रकाश गोसावी, नेते, मनसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: बोरघाटात थरार! मिसिंग लिंक मार्गावर अनेक भरधाव वाहनांची एकमेकांना धडक; काही गाड्यांचा चक्काचूर

घरातील तांदळात विषारी रासायनिक पदार्थाची भेसळ, दोन वर्षीय चिमुकलीची प्रकृती गंभीर; १५ तासांत हृदय तीन वेळा बंद

Latest Marathi News Live Update : खासदार संजय देशमुखांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

Mahila Bachat Gat: अडीच एकर जमीन अन् १ लाखाचे अनुदान, फडणवीस सरकारची मोठी भेट

Scooter Airbag : आता कारप्रमाणे स्कूटर्समध्येही असतील एअरबॅग; अपघातात वाचवणार तुमचा जीव, पाहा कोणत्या कंपनीने आणली सुविधा

SCROLL FOR NEXT