tall buildings.jpg 
नाशिक

उंच इमारतींमध्ये फायर ऑडिट बंधनकारक; पन्नास हजार रुपये दंडाची तरतूद 

विक्रांत मते

नाशिक : शहरात पंधरा मीटरपेक्षा अधिक उंच साडेचार हजारांपेक्षा अधिक निवासी व व्यावसायिक इमारतींचे फायर ऑडिट बंधनकारक करण्यात आले असून, ऑडिट न केल्यास इमारतीचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याबरोबरच पन्नास हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. २००८ मध्ये राज्य शासनाने आगप्रतिबंधक कायदा लागू केला आहे. 

उंच इमारतींमध्ये फायर ऑडिट बंधनकारक
महापालिका हद्दीत पंधरा मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारती असूनही त्यांचे फायर ऑडिट होत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानुसार शासकीय कार्यालये, हॉटेल, लॉजेस, रेस्टॉरंट, इमारती, रुग्णालये, बहुमजली शैक्षणिक इमारती, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स, मॉल, ऑफिसेस अशा व्यावसायिक इमारती, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, मंगल कार्यालये, औद्योगिक इमारती, गुदामे, सर्व प्रकारच्या संमिश्र वापराच्या इमारती तसेच पंधरा मीटरपेक्षा अधिक उंच रहिवासी वापराच्या इमारतींना अग्निप्रतिबंधक यंत्रणा बंधनकारक करण्यात आली आहे. अग्निरोधक यंत्रणा बसविल्यानंतर वर्षातून दोनदा म्हणजे जानेवारी व जुलैत त्या यंत्रणा सुस्थितीत आहेत की नाही, याबाबत पाहणी केली जाते. मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांकडून तसे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे लागते. शहरात साडेचार हजारांपेक्षा अधिक इमारतींना फायर ऑडिट बंधनकारक असताना ते होत नाही.

पाणी, वीजपुरवठा खंडितबरोबरच पन्नास हजार रुपये दंडाची तरतूद 

भंडारा येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने पंधरा मीटर उंच इमारतींसाठी विशेष सूचना जारी केली आहे. ऑडिट न केल्यास इमारतीचा पाणी व वीजपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतरही उपाययोजना न केल्यास २० ते ५० हजारांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत फायर ऑडिटच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Marathi News Live Updates : आयआयटी मुंबईबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT