Firefighters and villagers extinguishing the fire at the house of farmer Dada Sable. esakal
नाशिक

Nashik Accident News: अडसरेत घराला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

सकाळ वृत्तसेवा

सर्वतीर्थ टाकेद : अडसरे बुद्रुक (ता. इगतपुरी) येथील शेतकरी दादा विठ्ठल साबळे व खंडू पांडू साबळे यांच्या राहत्या घराला सोमवारी (ता. १३) सकाळी अकराच्या दरम्यान अचानक भीषण आग लागली.

सुदैवाने कुटुंबातील सर्व शेतावर भात काढणीसाठी गेल्याने मोठी जीवितहानी टळली. धुराचे लोट दिसताच ग्रामस्थ व तरुणांनीघराकडे धाव घेतली. (Fire breaks out at house in Adsar Fortunately no loss of life Nashik News)

सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी व पोलिसपाटलांशी संपर्क करून सार्वजनिक पाणीपुरवठा टाकीवरून पाइपलाइनच्या साहाय्याने व बदल्यांच्या साहाय्याने पाणी आणत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र, आगीत घरातील संसारपयोगी साहित्य, कापणी करून काढलेले भात, बी बियाणे, सागवान कौलारु लाकडी घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीत घराचे मोठे नुकसान झाले आहे.

सरपंच, पोलिसपाटील यांनी तत्काळ इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारावकर यांच्याशी संपर्क साधत मदतीसाठी मागणी केली. तहसीलदार अभिजित बारावकर यांनी इगतपुरीनगर परिषदेचा अग्निशमन दलाचा बंब पाठवला.

घोटीचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करण्यात आला. आग कशामुळे लागली, याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, हवालदार शेलार, शिवाजी शिंदे, मोरे करीत आहेत.

अंदाजे अडीच लाखांचे सागाचे साठ वासे, खांड, जवळपास तीन लाख रुपयांची सागवान पाटई, खिडक्या, दरवाजे, अडीच लाखांचे अन्न धान्य आणि संसारपयोगी साहित्य व सरकारी कागदपत्रांसह ८० हजार रुपयांची रोकड व दागिने असे जवळपास घरासह अंदाजे १६ लाखांचे नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्त शेतकरी दादा साबळे यांना शासनाने त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच सतू साबळे, पोलिसपाटील प्रवीण साबळे व ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT