Fire broke out at blood bank in Ashirwad Complex. esakal
नाशिक

Nashik : बीट मार्शलमुळे मोठा अनर्थ टळला

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : जिल्हा परिषद समोरील आशीर्वाद कॉम्प्लेक्स इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर आग लागण्याची घटना (Fire Acccident) रविवारी (ता. १७) रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली.

ही घटना गस्तीवरील भद्रकाली पोलिस ठाण्याचे बीट मार्शलच्या लक्षात आल्याने त्यांनी त्वरित नियंत्रण कक्षाला माहिती कळविली. त्यामुळे अग्निशामक विभागाचे कर्मचारी अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले आणि अनर्थ टळला. (Fire broke out at blood bank in Ashirwad Complex saved by bit marshal nashik latest marathi news)

आशीर्वाद कॉम्प्लेक्स दुसऱ्या मजल्यावर नवजीवन रक्तपेढी आहे. शॉर्टसर्किट झाल्याने रक्तपेढीच्या स्टोअर रूमला अचानक आग लागली. स्टोअर रूम बंद होते आणि रात्रपाळीचे कर्मचारी पुढील भागात असल्याने शॉर्टसर्किटचा आवाज त्यांना आला.

त्यांनी स्टोअर रूमकडे धाव घेतली. दरम्यान, जिल्हा परिषदसमोरून त्र्यंबक रोडने गस्त करणारे भद्रकाली पोलिस ठाण्याचे बीट मार्शल समाधान धीवर आणि अनिल महाजन यांना स्टोअर रूमच्या खिडकीतून धूर बाहेर पडत असल्याचे दिसले.

त्यांनी अग्निशामक विभागाच्या १०१ क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो क्रमांक व्यस्त येत असल्याने त्यांनी कुठलाही वेळ न घालवता पोलिस नियंत्रण कक्षास घटनेची माहिती दिली. नियंत्रण कक्षावरून अग्निशामक विभागात संपर्क साधला.

अग्निशामक विभागाला माहिती मिळताच शिंगाडा तलाव मुख्यालय येथील कर्मचारी बंबासह अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाण्याचा मारा केला. आगीची तीव्रता जास्त असल्याने खिडकीच्या काचा फुटून खाली पडत होत्या.

पोलिसांनी वाहतुकीसाठी रस्ता बंद करत एकतर्फी वाहतूक केली. पंधरा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी काळजी घेत पुन्हा स्टोअर रूममध्ये जाऊन बादलीच्या साह्याने आतील साहित्य आणि कागदपत्रांवर पाण्याचा मारा केला.

अशा पद्धतीने अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, आगीचे लोट खिडकीच्या बाहेर पडत असल्याने इमारतीतील अन्य व्यावसायिक आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दोन्ही बीट मार्शलने वेळीच सतर्कता दर्शविल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले.

आणखी काही वेळ गेला असता, तर संपूर्ण इमारत आगीच्या कचाट्यात सापडून मोठी दुर्घटना घडली असती. आगीमध्ये स्टोअर रूममध्ये ठेवलेले रेकॉर्ड आणि रक्तदान करताना वापरण्यात येणाऱ्या काही वस्तू जळून राख झाल्या. भद्रकाली पोलिस ठाण्यात अकस्मात जळीत नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT