YEO26B27482
सायगाव : मक्याच्या गंजीला लागलेली आग
------------
३६-२
मक्याच्या गंजीला आगीत
तीन एकरातील चारा खाक
सायगाव : शेतकऱ्यची भरपाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१२ : सायगाव येथे मक्याच्या गंजीला आग लागल्याने महेश सोनवणे यांचा सुमारे तीन एकर क्षेत्रातील चारा जळून खाक झाला. विशेष म्हणजे, हा चारा त्यांनी दुसऱ्यांकडून विकत आणून साठवून ठेवला होता. या आगीमुळे त्यांना आर्थिक भुर्दंड बसला असून जनावरांना चारा पुरवायचा कसा हा प्रश्न उभा राहिला आहे.
मंगळवारी (ता.१०) रात्री सुमारे आठच्या सुमारास अचानक गंजीला आग लागल्याचे लक्षात येताच महेश सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले होते. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुण आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत चारा वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. श्री. सोनवणे यांनी विकत आणलेला चारा साठवून ठेवला होता.
स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आगविझविण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे सायगाव येथील शेतकरी बाळासाहेब उशीर यांनी नुकताच नवीन जेसीबी विकत घेतला असून त्याची पूजा झाली. घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने जेसीबीसह घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ, अग्निशमन दल आणि जेसीबीच्या सहाय्याने प्रयत्न केल्याने सुमारे तीन एकरातील चारा वाचविण्यात यश आले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडून अग्निशमन वाहनावरील कर्मचाऱ्याने ४ हजार रुपये शुल्क आकारल्याने महेश सोनवणे यांनी नाराजी व्यक्त केली. शासनाने नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी तसेच आपत्कालीन अग्निशमन सेवेसाठी शेतकऱ्यांना शुल्कमाफी द्यावी अशी मागणी होत आहे.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.