नाशिक

फटाक्यांमुळे अवघ्या चार तासात आगेच्या २५ घटना

CD
पान-३ ---- OLN26A15201 मदिना चौक (जुने नाशिक) ः फटाक्यांमुळे येथील मोकळ्या जागेवरील भंगार साहित्याला रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास लागलेली आग. (छायाचित्र ः युनूस शेख) ----- फटाक्यांमुळे चार तासात २५ ठिकाणी आग --------- सुदैवाने जीवितहानी नाही ः एकाचवेळी घटनांनी अग्निशमनची मात्र धावपळ ----------- सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. ८ : फटाक्याच्या आतषबाजीने अवघ्या चार तासात आगीच्या २५ घटना घडल्या. सुदैवाने कुठल्याही घटनेत जीवितहानी झाली नाही. असे असले तरी एकाच वेळी शहराच्या विविध भागात घटना घडल्याने अग्निशमन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धावपळ उडालेली दिसून आली. ----------- दरवर्षी फटाक्याच्या आतषबाजीमुळे आग लागण्याच्या घटना घडत असतात. याची दक्षता घेत अग्निशामक विभाग सज्ज होते. रविवारी (ता. ८) रात्री लक्ष्मीपूजन संपन्न होताच सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. यामुळे शहराच्या विविध भागात मोकळे मैदान, पडके वाडे, कचराकुंडी अशा विविध भागात आग लागण्याच्या घटना घडल्या. रात्री सात ते दहाच्या दरम्यान चार तासात तब्बल २५ ठिकाणी लहान मोठ्या स्वरूपात आग लागल्याने अग्निशमन विभागाचा भ्रमणध्वनी सतत खणखणत होता. सारडा सर्कल येथील मदिना चौक परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर पडीक अर्थात वाहनांचे सीट कव्हर, कुशन, इतर स्क्रॅप साहित्य आणि मैदानावरील कचरा झाडेझुडपे यांना रात्री पावणेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे उंचउंच लोट आणि धुराने संपूर्ण परिसर जणू अंधारला होता. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन मुख्यालयाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत आगीवर पाण्याचा मारा करून नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. आगीची तीव्रता अधिक असल्याने सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नाने आग विझवण्यात यश आले. असे असले तरी भंगार साहित्य मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याखाली आगीचा विस्तव असल्याने पुन्हा आग भडकण्याची शक्यता लक्षात घेता अग्निशमन विभाग घटनास्थळी तळ ठोकून होते. राजीवनगर येथील मोकळ्या मैदानावरही मोठी आग लागली होती. स्थानिक नागरिक आणि सिडको अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. मेन रोड मुख्य बाजारपेठेतील एका दुकानाच्या वरील बाजूस वाढलेल्या झाडाझुडूपांमध्ये आग लागल्याची घटना घडली. शहराच्या सर्वच भागांमध्ये कमी जास्त प्रमाणात आगीच्या घटना घडल्या. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नाही. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Judge Tukaram Mote Death : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या 42 वर्षीय न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत; कवठेमहांकाळ तालुक्यातील घटनेने हळहळ

Decoration Godown Fire : कोल्हापुरात डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग; ऐन दिवाळीत फुलेवाडी रिंग रोड परिसरात खळबळ, अग्निशमन दलाचे तीन बंब दाखल

Pune News: वळती अतिरिक्त वीज उपकेंद्राचा मार्ग मोकळा; जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर गणेश महाडीक यांचे उपोषण मागे

Latest Marathi News Live Update: : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Saudi Arabia Attack : आखातात पुन्हा युद्धाचा भडका! राजधानीवर बंडखोरांचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; प्रसिद्ध टॉवरचे मोठे नुकसान!

SCROLL FOR NEXT