fire ozar.jpg
fire ozar.jpg 
नाशिक

जनित्रातून निघालेल्या साधारण ठिणग्यांचे क्षणातच रौद्ररुप...वर्कशॉप संपूर्णत: खाक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / ओझर : महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या जनित्रतून निघालेल्या   ठिगण्यांतुन लागलेल्या आगीत एक सोफासेटचे वर्कशाॅप पुर्णपणे जळुन खाक झाले. एचएएलच्या अग्निशामक दलाच्या जवानांच्या दिड तासाच्या अथक प्रयत्नानंतर हि आग आटोक्यात आली.

असा घडला प्रकार
या बाबतची माहिती अशी की मुंबई आग्रा महामार्गावर पगार अॅटोमोबॉईल्स बजाज शो रूम शेजारी महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीचे विद्युत जनित्र (ट्रान्सफार्मर) असुन सकाळी (ता.४) पावणेनऊच्या सुमारास त्या जनित्रातुन स्पार्किग होत होते. स्पार्किंगमुळे पडत असलेल्या ठिणग्या खाली असलेल्या पालापाचोळ्यावर पडल्या अन् काही वेळातच खालील पालापाचोळ्याने पेट घेतला. काही क्षणातच जवळच असलेल्या अमित अहिरे यांच्या सोफासेट वर्कशाॅपच्या बाहेर पडलेल्या ( प्लॅस्टिक सीट ) देखील पेट घेतला.

बघता बघता काही वेळातच आगीचे रौद्ररूप

बघता बघता काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी काही नागरिकांनी ओझर पोलीसांना कळवल्यानंतर ओझर पोलीसांनी याची माहिती एच ए एल च्या अग्निशामक दलास दिली. यानंतर दलाच्या जवानांनी सुमारे दिड तासाच्या प्रयत्नाने ही लागलेली आग आटोक्यात आणली. यावेळी मदतीसाठी ओझर पोलीस ठाण्याचे के.बी.यादव, अनुपम जाधव, अनिल काळे नितिन कारंडे, खांडवे, भुषण शिंदे यांच्यासह ग्रा पं सदस्य प्रकाश महाले संजय पगार आदिंनी घटनास्थळी येऊन मदत केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईला आव्हान देण्यासाठी पंजाब सज्ज; आत्तापर्यंत कोणाचं पारडं राहिलंय जड

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

SCROLL FOR NEXT