नाशिक

फटाके फोडण्यास विरोध केल्यावरून प्राणघातक हल्ला

CD
फटाके फोडण्यास विरोध; चौघांकडून प्राणघातक हल्ला खडके चाळ परिसरातील घटना; मुलगा गंभीर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : शहरातील खडके चाळ परिसरात फटाके फोडण्यास विरोध केल्याचा राग आल्यावरून चौघा जणांनी घरात घुसून एका कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत अल्पवयीन मुलाच्या डोक्यात लाकडी दांडा लागून तो गंभीर जखमी झाला आहे. शहर पोलिस ठाण्यात चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नलिनी रमेश बाविस्कर (वय ७०) या सोमवारी (ता. ९) रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या घराच्या हॉलमध्ये टीव्ही बघत असताना संशयित दीपक किशन सोनवणे व सीमा दीपक सोनवणे (दोन्ही रा. खडके चाळ, जळगाव) यांनी त्यांच्या घरात घुसून वृद्धेस चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. यानंतर नलिनी यांचा मुलगा हर्षल हा बाहेर निघाला असता, त्याच्या दुचाकीची नासधूस केल्याचे दिसून आले. त्यावरून जाब विचारल्यावरुन पुन्हा वाद वाढून संशयित अक्षय सोनवणे याने लाकडी दांड्याने अल्पवयीन मुलगा हर्षल याच्या डोक्यात मारले. तसेच विशाल सोनवणे यानेही फिर्यादीच्या मुलाला चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस नाईक प्रदीप पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

'बेसन लाडू to रसमलाई' वनिता खरातने दाखवली डाएटची कमाल; ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो पाहून चाहते म्हणाले, 'तू कमाल आहेस!'

Sakal Lit Fest: सकाळ लिट फेस्ट 2026चा पुण्यात दिमाखदार प्रारंभ; बानू मुश्ताक, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन

Latest Marathi News Live Update : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण शक्य नाही; सतेज पाटलांची सडेतोड भूमिका

Beed Crime: बीडमध्ये फटाका फेकण्याच्या वादातून चाकूहल्ला; पाच जण गंभीर जखमी, तिघांना अटक

SCROLL FOR NEXT