Onion Subsidy esakal
नाशिक

Onion Subsidy: कांदा अनुदानाचा पहिला हप्ता खात्यात वर्ग होण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा

Onion Subsidy : कांदा अनुदानासाठी पात्र असलेल्या जिल्हयातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून गुरूवारपासून (ता.७) शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजारांचा पहिला हप्तांचे अनुदान जमा होण्यास सुरूवात झाली आहे.

काही शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान प्राप्त झाले आहे. अनुदान प्राप्त होत असले तरी, याची नेमकी आकडेवारी जिल्हा उपनिंबधक कार्यालयाकडे रात्री उशीरापर्यंत प्राप्त झालेली नव्हती. (first installment of Onion Subsidy will be credited to accounts nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्हयात फेब्रुवारीत कांद्याचे भाव पडल्याने शासनाने कांद्यासाठी शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.

जिल्हयातील एक लाख 72 हजार 152 शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले असून यासाठी 435 कोटी 61 लाख 23 हजार 578 अनुदान मंजूरदेखील करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील अनुदानाची रक्कम मोठी असल्याने मंजूर आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

होणाऱ्या निधीच्या विनियोगानुसार जिल्हयातील शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. ज्या जिल्हयांची मागणी 10 कोटीपेक्षा जास्त आहे.

अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कमीत कमी 10 हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे नाशिकला पहिला हप्ता मिळणार आहे.

पहिल्या हप्त्यांची ही रक्कम गुरूवारपासून शेतक-यांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. खात्यात अनुदान जमा होणा-या शेतक-यांची संख्या नगण्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT