omicron Sakal
नाशिक

Omicron | नाशिक शहरात ओमिक्रॉनच्या पहिल्या रूग्णाची नोंद

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : राज्यात ओमिक्रॉन (Omicron) रूग्ण आढळत होते मात्र नाशिक जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झालेला नव्हता. गुरूवारी (ता. 30) जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये शहरातील एका बाधितामध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळला आहे. तपासणीसाठी गेलेल्या या रूग्णात जिनोम सिक्वेंसिंग मध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्याने नाशिक शहरातील पहिल्या ओमिक्रॉन बाधित रुग्णाची नोंद झाली आहे.

सदर रुग्णाला कुठलेही लक्षणे (Non-symptomatic) दिसत नसून त्याची प्रकृती व्यवस्थित आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. या व्हेरिएंटच्या प्रसाराची गती विचारात घेता नागरिकांनी कोरोना (Corona) प्रतिबंधाच्या सर्व सुचनांचे स्वतःहूनच व्यवस्थित पालन करणे आवश्यक आहे. स्वतःचे लसीकरण (Vaccination) करून घेणे हे यावरील सर्वात महत्वाचे सुरक्षाकवच आहे. त्यामुळे उरलेल्या नागरिकांनी तातडीने स्वतःचे लसीकरण करून घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

प्रशासन झाले सतर्क
सदर रूग्णाने परदेशात प्रवास केला आहे का, किंवा रूग्णाचा अन्‍य वैयक्‍तिक स्‍वरुपाचा तपशील प्रशासनाने गोपनीय ठेवला आहे. दरम्‍यान नाशिकमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्‍हेरीएंट आढळून आल्‍यानंतर जिल्‍हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्‍या सूचना जिल्‍हा प्रशासनाने जारी केल्‍या आहेत. जिनोम सिक्‍वेंसिंगसाठी पाठविल्या जाणाऱ्या नमून्‍यात वाढ केली जाण्याची शक्‍यता आहे.

''रँडम तपासणीमध्ये गेलेल्‍या जिनोम सिक्‍वेंसिंगमध्ये नाशिक शहरातील पहिला ओमिक्रॉन रुग्‍ण आढळला आहे. रुग्‍ण हा नॉन सिम्‍टोमॅटिक असून, त्‍याची प्रकृती व्‍यवस्‍थित आहे. नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. परंतु या व्‍हेरीएंटच्‍या प्रसाराची गती विचारात घेता नियमांचे काटेकोर पालन आवश्‍यक झाले आहे. लसीकरणाला प्राधान्‍य द्यावे. - सूरज मांढरे, जिल्‍हाधिकारी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Alternative India : एलपीजीला नवा स्वस्त पर्याय! महागड्या सिलिंडरपासून सुटका, इथेनॉलवर बनणार स्वयंपाक; सरकारची योजना ठरणार गेमचेंजर

मुलाने लग्नाचा निर्णय सांगितल्यावर प्रसाद-मंजिरीने दिलेली अशी प्रतिक्रिया; "तो खूप इमोशनल झाला"

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठी खबरदारीची बातमी! पाणीपुरवठ्यात आठवडाभर कपात, कोणत्या परिसरात आणि कधी? जाणून घ्या...

प्रभुकुंज ते दुबईचे रेस्टॉरंट! आशा ताईंच्या निधनानंतर त्यांच्या अफाट मालमत्तेचा मालक कोण? त्यांच्या मृत्युपत्रानुसार...

Match Fixing: भारताने जिंकलेल्या T20 World Cup 2026 स्पर्धेत फिक्सिंग? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावरच संशय, ICC ने सुरू केलाय तपास

SCROLL FOR NEXT