नाशिक

वारे येथे जिल्ह्यातील पहिला स्ट्रॉबेरी उपबाजार

CD
पान दोन -------------------- 13362 (जुना आहे) वारे : उपबाजार आवाराच्या फलकाने अनावरण व स्ट्रॉबेरी खरेदी विक्रीचा शुभारंभ करताना मंत्री नरहरी झिरवाळ. शेजारी धनराज महाले, रामदास चारोस्कर, प्रशांत कड, गणपत पाटील. वारे येथे जिल्ह्यातील पहिला स्ट्रॉबेरी उपबाजार उत्पादकांचा वाहतूक खर्च वाचणार; व्यापाऱ्यांचा प्रतिसाद सकाळ वृत्तसेवा वणी, ता. २८ : दिंडोरी तालुक्यातील वारे येथे दिंडोरी बाजार समितीच्या नियोजित उपबाजारात आवारात स्ट्रॉबेरी खरेदी-विक्रीचा शुभारंभ रविवारी (ता. २५) झाला. बाजार समिती आणि वारे ग्रुप ग्रामपंचायतीच्या संयुक्त पुढाकारातून सुरू झालेला हा उपक्रम नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीतंर्गत पहिले स्ट्रॉबेरी मार्केट ठरले. या बाजारपेठेमुळे उत्पादक शेतकऱ्यांना जवळच शेतमाल विक्रीची सुविधा उपलब्ध झाली असून, पहिल्याच दिवशी शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वारे, भनवड, ननाशी, माळेगाव काजी, घागबारी परिसरात व कादवा नदीच्या किनारी भागातील शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. मात्र, शेतमालाच्या विक्रीसाठी दूरच्या बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागत असल्याने वाहतूक खर्चासह वेळही खर्च होत होता. वारे येथेच खरेदी-विक्रीची व्यवस्था सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची ही अडचण कमी होण्यास मदत होणार आहे. रविवारी उपबाजारात शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये लिलाव पद्धतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी स्ट्रॉबेरीला चांगला दर मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. या बाजारपेठेच्या माध्यमातून परिसरातील अधिकाधिक शेतकऱ्यांना विक्रीची सुविधा मिळाल्यास स्ट्रॉबेरी उत्पादनाला प्रोत्साहन मिळू शकते. यावेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले, रामदास चारोस्कर, बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, गणपत पाटील, विलास कड, विश्वासराव देशमुख, गोपीनाथ पाटील, योगेश बर्डे, सम्राट राऊत, आबासाहेब देशमुख, नामदेवराव घडवजे, बाळासाहेब घडवजे, गंगाधर निखाडे आदींसह संचालक मंडळ, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

MLC election results: चार राज्यांतील 28 जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला एकही नाही; सत्ता असूनही कर्नाटकात काँग्रेसची धूळधाण

Pune News : शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्राधान्याने काम करणार, टीकेला कामातून उत्तर देणार; कौस्तुभ गावडे यांची ग्वाही

अमरावती शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर! किरण सरनाईक सलग दुसऱ्यांदा विजयी, काँग्रेसच्या अदिती पोहरेंचा पराभव

Marathi News Live Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी; काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव!

Spain Train Accident: स्पेनमध्ये भीषण अपघात; २ हाय-स्पीड रेल्वेगाड्यांची धडक; ३० जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT