Five dams in Dindori taluka are 100 percent full Sakal
नाशिक

दिंडोरी तालुक्यातील पाच धरणे 100 टक्के भरली!

रामदास कदम

दिंडोरी (जि. नाशिक) : तालुक्यात परतीच्या पावसाने शेवटच्या टप्प्यात ढगफुटीसारखा पाऊस पडल्याने पालखेड, वाघाड, करंजवण, पुणेगाव, तिसगाव, पालखेड या सहापैकी पाच धरणे भरल्याने पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. याचा फायदा दिंडोरी, येवला, निफाड तर काही प्रमाणात कोपरगाव तालुक्यात उपयोग होणार आहे.

पावसाळ्यातील जून ते आॅगस्ट महिन्यात फारसा पाऊस झालाच नाही, त्यामुळे तालुक्यावर दुष्काळाचे सावट होते. पालखेड धरण वगळता इतर धरणात फारसा साठा नव्हता. सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणे भरली आहेत.
करंजवण धरण ९८ टक्के भरले असून सध्या पाऊस थांबला असला तरी अजून साठ्यात वाढ होत आहे. गतवर्षी हे धरण फक्त ९२ टक्के भरले होते. वाघाड धरण शंभर टक्के भरले आहे. या धरणावर तालुक्यातील बहुतांश भाग अवलंबून आहे. पालखेड धरणातील पाण्याचा फायदा मोहाडी व खडकसुकेणे, लोखंडेवाडी, जोपूळ, चिंचखेड आदी गावांना होतो. इतर सर्व पाणी निफाड येवला तालुक्यांना जाते. पुणेगाव धरण शंभर टक्के भरले आहे. तिसगाव धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे. ओझरखेड धरणातही तब्बल ८८.१७ टक्के साठा आहे. दरम्यान या धरणातील पाण्याचे संबंधित विभागाने काळजीपूर्वक नियोजन केले तर पाणीटंचाई निर्माण होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT