Subsidy to farmers esakal
नाशिक

Nashik News: पाचशे शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित! निफाड तालुक्यातील 7 हजार 438 शेतकऱ्यांना लाभ

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मात्र, आतापर्यंत पाचव्या यादीनंतर सहाव्या यादीत तरी आपले नाव येईल, अशा आशेवर बसलेल्या निफाड तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांच्या पदरी अद्याप तरी निराशाच आहे.

आतापर्यंत तालुक्यात सात हजार ४३८ शेतकऱ्यांना ३५ कोटी २४ लाख रुपयांचे वाटप झाले आहे. (Five hundred farmers deprived of incentive subsidy 7 thousand 438 farmers of Niphad taluka benefited Nashik News )

नियमित परतफेडीमुळे कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने प्रोत्साहन अनुदानाची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी महायुती सरकारने केली.

जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्जदार असलेल्या निफाड तालुक्यात १६ हजार ५७० शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर भरण्यात आली;

पण दोन वर्षे नियमित कर्जफेडीसह विविध निकषांमुळे त्यातील आठ हजार ६२६ शेतकऱ्यांच्या नावाला शासनाने लाभ देण्यावर फुली मारली; तर सात हजार ९४४ शेतकरी पात्र ठरले. त्यानुसार टप्प्याटप्प्याने हे प्रोत्साहन अनुदान वाटपाचे काम शासनातर्फे सुरू झाले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्रुटी दूर करताना आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या सहा याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मृत सभासद, वारस नोंद नसणे, चुकीचा आधार क्रमांक आदी त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याची कार्यवाही स्थानिक बँकांच्या माध्यमातून करण्यात आली.

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या सहा याद्यांत ५०० शेतकऱ्यांना अजूनही अनुदान मिळालेले नाही. पुढील यादीत तरी आपले नाव येईल, या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांची निराशा होत आहे.

अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना दोन कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. वंचित शेतकऱ्यांना अजूनही प्रोत्साहन अनुदान मिळण्याची आशा आहे.

"प्रोत्साहन योजनेपासून ५०० शेतकरी का वंचित आहेत, याची माहिती घेणार आहे. त्यातील त्रुटी दूर करून ५० हजार रुपयांचे अनुदान त्या शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे." - दिलीप बनकर, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

जेवढी ताकद लावायची आहे लावा साहेब... मराठी मुद्द्यावरून मनसेच्या विरोधात उतरला हिंदुस्तानी भाऊ? म्हणाला, 'ते लोक पैसे... '

SCROLL FOR NEXT