Accident esakal
नाशिक

विंचूर : रिक्षा आणि ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण ठार

दिपक घायाळ

विंचूर (जि. नाशिक) : विंचूर लासलगाव रस्त्यावर मंजुळा पॅलेसजवळ ता.२५ रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान रिक्षा व हायवा ट्रक यांच्यात भीषण अपघात (Accident) होवून रिक्षामधील रिक्षा चालक व चार प्रवासी असे पाच जण ठार झाले. यापैकी चार जण जागीच ठार झाले तर एक जण अत्यवस्थ असल्याने त्यास रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. ज्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

लासलगाकडून प्रवाशांनी भरलेली रिक्षा क्र.MH-15-Y-4461 विंचूरच्या दिशेने मंजूळा पॅलेसजवळ येत असतांना. विंचूरकडून लासलगावच्या दिशेने जात असलेला हायवा ट्रक क्र.MH-06-Z-7576 यांच्यात भीषण अपघात होवून रिक्षा चालक सुहास मनोहर निकाळे (वय ४० रा.विंचूर) तसेच प्रवासी विठ्ठल बाजिराव भापकर (वय ६५ रा.लोणी, प्रवरा), भाउसाहेब बाळासाहेब नांगरे (वय ६० रा. प्रवरा कॉलनी, लोणी बु), रतन सुकदेव गांगुर्डे (वय ४० रा. विंचूर), किसनदास गोविंदद‍ास बैरागी (वय ६० रा. धारणगाव खडक) हे जागीच ठार झाले. मृतांना लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राहूल वाघ, पो.उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, पो. हवा. राजेंद्र घुगे, योगेश शिंदे, कैलास मानकर दाखल होत हायवा ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास लासलगाव पोलीस करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

पत्नीच्या खून प्रकरणी पती-सासऱ्यासह ८ जण तुरुंगात गेले, १२ वर्षांनी जिवंत सापडली महिला

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

SCROLL FOR NEXT