Prasad Maharaj, Chairman of Sant Sakharam Maharaj Sansthan, Amalner, wearing a tulsi garland made by Anushka Patil of 'Floral Art by Anushka' to Prime Minister Narendra Modi.  
नाशिक

PM Modi Nashik : ‘फ्लोरल आर्ट बाय अनुष्का’चा श्रीराम, सीता व लक्ष्मणास साज; पंतप्रधानांच्या गळ्यात तुळशीचा हार

विविध रंगाच्या फुलांना कलेद्वारे आगळेवेगळे रूप देणाऱ्या ‘फ्लोरल आर्ट बाय अनुष्का’च्या संचालिका अनुष्का पाटील यांनी आपल्या कलेचा प्रभाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात पाडला.

प्रशांत कोतकर : सकाळ वृत्तसेवा

PM Modi Nashik Visit : विविध रंगाच्या फुलांना कलेद्वारे आगळेवेगळे रूप देणाऱ्या ‘फ्लोरल आर्ट बाय अनुष्का’च्या संचालिका अनुष्का पाटील यांनी आपल्या कलेचा प्रभाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात पाडला.

श्री काळाराम मंदिरातील श्रीरामास केलेला साज पाहून पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक केले. (Floral Art by Anushka adorns to pm modi Ram Sita and Lakshmana nashik news)

त्यांच्या गळ्यात वारकरी संप्रदायातर्फे घालण्यात आलेला हार पाहून ते अधिक भारावून गेले. ‘फ्लोरल आर्ट बाय अनुष्का’चा नाशिकपासून सुरू झालेला प्रवास जगभर पोचला आहे. आता सर्वसामान्यांपासून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींकडील समारंभ व धार्मिक संस्थानामध्ये अनुष्का पाटील यांच्या कलेच्या आविष्काराला मागणी होऊ लागली आहे.

श्री काळाराम मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी त्यां फुलांना कलेने देत असलेला साज पाहून शुक्रवारी श्री काळाराम मंदिरातील मूर्तींच्या फुलांचा साज व पंतप्रधानांसाठी तुळशीची माळ बनविण्याचे काम दिले होते. अनुष्का यांनी केलेला साज पाहून पदाधिकारीच नव्हे, तर पंतप्रधान मोदी यांनीदेखील त्यांचे कौतुक केले.

''संस्थानच्या पदाधिकाऱ्यांमुळे आज मला प्रभू श्रीरामाची सेवा जगमान्य नेता तथा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी तुळशीची माळ बनविण्याचे भाग्य प्राप्त झाले. आज खऱ्या अर्थाने माझी कला जगमान्य झाली आहे.''-अनुष्का पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT