flower market at ganeshwadi SOMNATH KOKARE
नाशिक

नाशिकच्या फुल बाजाराला बहर! गणेशोत्सवामुळे रोज लाखोंची उलाढाल

दत्ता जाधव


पंचवटी (नाशिक) :
कोरोनाकाळात गतवर्षी इतर बाजारांबरोबरच फूल बाजारही कोमेजून गेला होता. देवस्थाने अद्यापही बंदच असूनही गणेशोत्सवाच्या धामधुमीमुळे गणेशवाडीतील फूल बाजाराच्या अर्थकारणास चांगलीच गती मिळाली असून, रोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.


सध्या सर्वत्र गणेशोत्सवामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. या वातावरणात फूल बाजारात तेजीचे वातावरण आहे. गणेशवाडीतील फूल बाजारातही रोज मोठी उलाढाल होत असल्याचे अनेक विक्रेत्यांनी सांगितले. शेवंती, झेंडू, गुलाबासह गणपतीला प्रिय असलेल्या जास्वंदाच्या फुलांना मोठी मागणी असल्याचे दिसून आले. बुधवार (ता.१५) पासून पावसाने उघडीप दिली आहे, मात्र शनिवार (ता.१०) पासून सुरू असलेल्या पावसाने फूल विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांनी खरेदी केलेले फुले सडून गेल्याने फेकून द्यावे लागले. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे उत्पादकांसह विक्रेत्यांनी सांगितले. आता पावसाने उघडीप दिल्याने पुढील चार दिवस चांगला व्यवसाय होईल, असा विश्‍वास विक्रेत्यांनी व्यक्त केला.


गुलाब खातोय भाव

सध्या लग्नसराई नाही, मात्र तरीही गणेशोत्सव सुरू असल्याने गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी आहे. त्यामुळे एरवी दहा पंधरा रूपयांत मिळणारी दहा फुलांच्या गुच्छासाठी पन्नास ते साठ रुपये मोजावे लागत आहेत. शहरात नाशिकसह निफाड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गुलाबाच्या फुलांची आवक होते.

हार पन्नास रुपयांना

गणेशोत्सवात जास्वंदच्या फुलांना मोठी मागणी असते, परंतु जोरदार पावसामुळे जास्वंदच्या फुलांची आवक घटली आहे. मात्र गुलाब, झेंडू, शेवंती, ॲस्टरच्या फुलांना मोठी असल्याने या फुलांच्या एका हारासाठी पन्नास रुपये मोजावे लागत आहेत. हाराच्या किमती भडकल्याने अनेक गृहिणींनी घरी फुले आणून हार बनविण्याला अधिक पसंती दिली आहे.



पहाटे वाहतूक कोंडी

जुन्या आडगाव नाक्याकडून शहराकडे येण्यासाठी गणेशवाडीतून जवळचा रस्ता आहे. मात्र, येथे भरणाऱ्या बाजारात भल्या पहाटेच आसपासच्या गावातील फूल उत्पादक मोठ्या संख्येने येत असल्याने पहाटेपासून सकाळी आठ- नऊपर्यंत या भागात वाहतूक मोठी कोंडी होते. त्यामुळे अनेकवेळा फुल विक्रेते व वाहनधारकांत तु- तू, मै- मै होत असल्याचे दिसून येते. हा बाजार अल्पकाल भरत असलातरी तो भर रस्त्यावर भरत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT