Nashik District Co-op. Bank Administrator District Bank Administrator Pratap Singh Chavan while speaking at the District Back Rescue Mela organized on behalf of the Bank Employees Union.
Nashik District Co-op. Bank Administrator District Bank Administrator Pratap Singh Chavan while speaking at the District Back Rescue Mela organized on behalf of the Bank Employees Union. esakal
नाशिक

NDCC Bank: वसुलीवर भर, नवीन वैयक्तीक सभासद वाढविण्यावर भर; जिल्हा बॅंक बचाव मेळाव्यात निर्धार

सकाळ वृत्तसेवा

NDCC Bank : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला वाचविण्यासाठी वसुलीवर भर देऊन वाढलेला एनपीए कमी करणे, नवीन वैयक्तीक सभासद वाढवून भागभांडवलात वाढ करण्याचा निर्धार जिल्हा बॅंक बचाव मेळाव्यात करण्यात आला.

जिल्हा बँकेचे आरबीआयचे लायसन्स अबाधित ठेवण्यासाठी हा कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यासाठी बँकेला नाइलाजाने कार्यवाही करावी लागत आहे.

त्यामुळे सर्व कर्मचारीवर्गाने जूनपर्यंत एकही सुट्टी न घेता बँकेसाठी एकच ध्यास घेऊन बँकेच्या ठेववाढ, वसुली, बँकेच्या भागवाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करावे, असे आवाहन बॅंकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी केले. (focus on recovery focus on increasing new individual members Determination in NDCC Bank Rescue Meeting nashik news)

जिल्हा बॅंक वाचविण्यासाठी सरसावलेल्या बॅंक कर्मचाऱ्यांनी बँक वाचविण्यासाठी, बँकेची ढासळलेली आर्थिक स्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी नाशिक डिस्ट्रीक्ट सेन्ट्रल को ऑप बँक एम्प्लाईज युनियनच्या वतीने शुक्रवारी (ता.५) जिल्हा बँक बचाव मेळाव्याचे आयोजन केले होते.

यावेळी शिखर प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे प्राचार्य बाळासाहेब देशमुख, सहकार तज्ज्ञ बाळासाहेब पतंगे, बॅंकिंग अभ्यासक सुभाष साळुंखे, जिल्हा बॅंकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण, महाराष्ट्र राज्य सचिव संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ निकम, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आशिया खंडातील नावाजलेली जिल्हा बँक अनेक पुरस्कार प्राप्त मिळालेली बँक असताना ही बँक वाचविण्यासाठी बचाव मेळावा घ्यावा लागतो, अत्यंत दुःख वाटते. मात्र, बॅंकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व सचिव कटिबद्ध असल्याची ग्वाही विश्वनाथ निकम यांनी दिली.

प्राचार्य देशमुख, बाळासाहेब पतंगे आणि सुभाष सांळुखे यांनी बँकेच्या सर्व कर्मचारीवर्ग व जिल्ह्यातील विविध कार्यकारी संस्थांचे सर्व सचिव वर्ग, तसेच आदिवासी संस्थांचे सचिव यांना प्रभावी वसुली कशी करावी, वसुलीचे आधुनिक तंत्र व कौशल्ये व जिल्हा बॅंकेपुढील आव्हाने व उपाय योजना यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

जिल्हा बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. यासाठी बँकेचे प्रशासक, सर्वच कर्मचारी, विविध कार्यकारी संस्थांचे सर्व सचिव वर्ग व सर्व घटकांच्या सहकार्याने भरीव कर्ज वसुली करून लवकरच बँकेस पूर्वपदावर आणण्याचा कसोशीने प्रयत्न करावे, असे आवाहन प्रास्ताविकात संघटनेचे अध्यक्ष रतन जाधव यांनी केले.

मेळाव्यास, संघटनेचे प्रदीप शेवाळे, साहेबराव पवार, मिलिंद देवकुटे, गोपीचंद निकम, नंदकुमार तासकर, सुभाष गडाख, मिलिंद पगारे, जिल्हा सचिव संघटनेचे अध्यक्ष देविदास नाठे, आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ गुड यासह कर्मचारी, सचिव उपस्थित होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

वसुलीशिवाय पर्याय नाही

थकबाकीदाराकडे अडकलेला पैसा जिल्हा बँकेतील ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींचा असून थकबाकीदारांकडून वसूल करून ठेवीदारांच्या ठेवी देण्याची जबाबदारी रिझर्व बँकेच्या कायद्यानुसार बँकेची आहे. बॅंकेतील ठेवीदारांच्या सर्व ठेवी सुरक्षित आहे.

त्यांचा विमा काढण्यात आलेला आहे. बँकेच्या भागभांडवलात वाढ करण्याच्या दृष्टीने वार्षिक सर्व साधारण सभेत बँकेचे नवीन वैयक्तिक सभासद करून घेणेबाबत मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार बँकेने अटी व शर्तीनुसार नवीन वैयक्तिक सभासद करणेबाबत कार्यवाही सुरु केली आहे.

कर्मचारी वर्गाने आपल्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त लोकांना सभासद करून बँकेच्या भाग भांडवलात वाढ करावी. थकबाकी मोठी असल्याने वसुलीशिवाय पर्याय नाही. यासाठी वसुलीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासक चव्हाण यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT