certification under eat right india
certification under eat right india esakal
नाशिक

Eat Right India Activity : श्री अन्नपूर्णा प्रसादालयास भोग प्रमाणपत्र प्रदान

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. नाशिक) : आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड या विश्वस्त संस्थेने भाविकांसाठी कार्यान्वित केलेल्या श्री अन्नपूर्णा महाप्रसाद प्रक्रियेला केंद्र शासन व राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने ‘इट राइट इंडिया’ (Eat Right India) उपक्रमांतर्गत भोग प्रमाणिकरण केले आहे. (Food Drug Administration Department Central State Government under Eat Right India initiative Bhog authenticated Sri Annapurna Prasadalaya nashik news)

प्रमाणित केलेल्या अन्नपूर्णा प्रसादालयास शुक्रवारी (ता. ३) जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या हस्ते सप्तशृंग निवासिनी देवी संस्थानला भोग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

धार्मिक संस्थांच्या प्रसादालय, लंगर, भंडाऱ्यातील अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेस प्रोत्साहन देण्यासाठी ‘इट राइट इंडिया’ उपक्रमांतर्गत भोग प्रमाणिकरण केले जाते. त्यातंर्गत नाशिक जिल्ह्यातील श्री सप्तशृंगदेवी गड आणि त्र्यंबकेश्वरच्या श्री स्वामी समर्थ गुरुपीठातील प्रसाद प्रमाणित झाला आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे विभागीय आयुक्त विवेक पाटील, सह विभागीय आयुक्त महेश सानप, सहआयुक्त संदीप देवरे आदी उपस्थित होते. या प्रसंगी विश्वस्त संस्थेचे विश्वस्त मनज्योत पाटील, विश्वस्त ॲड. ललित निकम, भूषणराज तळेकर, विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार तसेच, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

सप्तशृंग निवासिनी देवी संस्थेतर्फे भाविकांना विविध प्रसाद व महाप्रसाद सुविधा या श्री अन्नपूर्णा प्रसादालय सुविधे अंतर्गत उपलब्ध करण्यात आल्या असून सदरची सेवा व सुविधा केंद्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न स्वच्छता व सुरक्षा मानकांची पूर्तता करीत असून भाविकांना महाप्रसाद सुविधा योग्य त्या दर्जासह स्वच्छता व सुरक्षेसह उपलब्ध करून देत असल्याने सदरचे प्रमाणपत्र प्रत्यक्ष मूल्यमापन व तपासणी अहवालाच्या समाधानकारक पूर्ततेनंतर देण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील प्रथम ८ व उत्तर महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकावर (विभागून) सदरचे भोग प्रमाणपत्र देण्यात आले आहे. नाशिक विभागात श्री क्षेत्र सप्तशृंगगड सह श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राच्या प्रसादालयला देखील भोग प्रमाणपत्र द्वारे प्रमाणित करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaish e Mohammed: जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना जन्मठेपेच्या शिक्षेतून सूट, निकाल देताना दिला रशियन लेखकाचा दाखला

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियाचे शेअर्स वधारले, नेस्लेचा शेअर घसरला

Sana Shinde: "36 अंश सेल्सिअस तापमान, 4 तास घामाने भिजल्यानंतर..."; मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सना शिंदेची पोस्ट

Justice Chitta Ranjan Das: आज मला खरं सांगायला हवं... निवृत्तीच्या दिवशी RSS बद्दल न्यायमूर्ती असे का म्हणाले?

Star Sports Hits Back Rohit Sharma : 'हिटमॅन' रोहित शर्माच्या आरोपांवर स्टार स्पोर्ट्सने केला पलटवार; म्हणाले...

SCROLL FOR NEXT