Ongoing distribution of khichdi pulao brought from rickshaws to relatives of patients in district hospital premises. esakal
नाशिक

Humanity : भुकेलेल्यांना अन्न, हाच माणुसकीचा धर्म! नाशिकमधील हॉटेलचा उपक्रम

रुग्णांच्या नातलगांना मिळतोय ‘अन्ना’तून आधार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘भुकेलेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या...’ असा सुविचार आहे. त्याचा अवलंब मुंबई नाका परिसरातील एका हॉटेल व्यावसायिकाने केला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हाभरातूनच नव्हे तर, परजिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येतात.

बहुतांशी रुग्ण व त्यांच्या नातलगांची परिस्थिती हलाखीची असते, अशा रुग्णांच्या नातलगांसाठी या नामांकित हॉटेलमधून दररोज सकाळी एका रिक्षातून अन्न आणून वाटप केले जाते. यामुळे या परगावच्या नातलगांना या अन्नातून मोठा आधार मिळतो आहे.

विशेषत: याबाबत संबंधित हॉटेल व्यावसायिक वा कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रसिद्धीपासून दूर राहण्याचाच प्रयत्न केला आहे. (Food for hungry people religion of humanity Hotel venture in Nashik news)

सर्वच धर्मांमध्ये अन्नदान करणे हे पुण्याचे मानले जाते. असे असले तरी कित्येकदा अन्नाची नासाडीच होताना दिसते. मात्र तेच अन्न जर भुकेलेल्यांची भूक शमवित असेल तर... नेमक्या याच अथवा अन्य कारणास्तव शहरातील मुंबई नाका परिसरात असलेल्या एका नामांकित हॉटेल व्यावसायिकांकडून गेल्या कित्येक महिन्यांपासून नित्यनेमाने दररोज सकाळी जिल्हा रुग्णालयात अन्नदान केले जाते. सदरचा उपक्रम अविरत सुरू आहे.

जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातूनच नव्हे तर, परजिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. बहुतांशी रुग्णांची परिस्थिती हलाखीची असते. जिल्हा रुग्णालयाच्या वतीने रुग्णांना जेवणाची सुविधा उपलब्ध असते.

मात्र रुग्णासमवेत असलेल्या नातलगांसाठी जेवणाची सोय नसते. त्यामुळे अनेकदा या रुग्णांच्या नातलगांवर काहीतरी खाऊन गुजराण करावी लागते. मात्र, या नामांकित हॉटेल व्यावसायिकाच्या अन्नदानाच्या उपक्रमामुळे येथील रुग्णांच्या नातलगांना मोठा आधार मिळतो आहे.

मात्र, हॉटेल व्यावसायिकाकडून वा अन्नदान करण्यासाठी येणाऱ्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रसिद्धीचा हव्यास नाही, हे विशेष.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

तांदळापासून बनविलेले विविध पदार्थ

या नामांकित हॉटेलमधून दररोज सकाळी आठच्या सुमारास एका रिक्षातून दोन मोठ्या पातेल्यातून खिचडी पुलाव आणला जातो. रिक्षा आल्यानंतर रुग्णालयाच्या आवारात असलेल्या रुग्णांना नातलगांना रांगेत अन्नदान केले जाते.

दररोज तांदळापासून बनविलेले विविध पदार्थ आणले जातात. साधारणत: ५० किलो अन्नदान केले जाते. दररोज एकच एक पदार्थ न आणता कधी खिचडी पुलाव, तर कधी मसाला भात, दाल-खिचडी, व्हेज बिर्याणी आदी चविष्ट पदार्थ हॉटेलमधून आणले जातात.

सेवा परम धर्म !

सेवा ही परम धर्म है' हे संस्कृत सुविचार आहे. अर्थात, सेवा हाच परम धर्म आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT