National Food Security Scheme esakal
नाशिक

Food Security Scheme : दिंडोरी तालुक्यात अन्नसुरक्षा योजनेंतर्गत डिसेंबरपर्यंत धान्य!

सकाळ वृत्तसेवा

लखमापूर (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यात जानेवारी २०२३ मध्ये अंत्योदय योजना व प्रधान्य कुटुंब योजनेचे एकूण ४९ हजार ४३३ शिधापत्रिकाधारक असून, त्यावर एकूण दोन लाख ३७ हजार ८८१ लाभार्थी आहेत.

अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरीत केल्या जाणाऱ्या अन्न धान्यांचा लाभ हे लाभार्थी घेत असून त्यांना तीन रुपये प्रतिकिलो या दराने तांदूळ, दोन रुपये प्रतिकिलो या दराने गहू उपलब्ध करून देण्यात येतो.

तथापी केंद्राने राष्ट्रीय अन्य सुरक्षा योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांना जानेवारी २०२३ पासून एका वर्षाकरिता मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला असल्याने दिंडोरी तालुक्यात दोन लाख ३७ हजार ८८१ लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत मोफत धान्य मिळणार आहे. (Food Security Scheme Grain till December under Food Security Scheme in Dindori Taluka nashik news)

तसेच कोरोनाकाळात मोफत दिले जाणारे अन्नधान्य डिसेंबर २०२२ पासून बंद करण्यात आले असून, आता या शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमांतर्गत अंत्योदय योजना व प्रधान्य कुटुंब योजनेचे विकत मिळणारे धान्य १ जानेवारीपासून ३१ डिसेंबरपर्यंत मोफत मिळणार आहे.

त्यामुळे लाभार्थ्यांना रेशन दुकानातून धान्य घेताना दुकानदाराला त्यांना मिळणाऱ्या अन्न धान्याच्या बदल्यात पैसे देण्याची गरज नाही. राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमांतर्गत मोफत मिळणाऱ्या या धान्याबाबत लाभार्थ्यांनी रेशन दुकानदारकडून पावती घ्यावी तसेच याबाबत तक्रार असल्यास तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

"तालुक्यातील एकूण १७३ रेशन दुकानदारांनच्या वितरणप्रणालीकडून अन्नसुरक्षा योजनेंतर्गंत लाभार्थी जनतेला याचे विनामूल्य वितरण होणार असून, यात काही अडचण आल्यास दिंडोरी तहसील कार्यालयाकडे संपर्क साधावा."- अक्षय लोहारकर, पुरवठा अधिकारी, दिंडोरी

"केंद्र शासनाने डिसेंबर २०२३ पर्यंत मोफत नियमित धान्य देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला असून, याबाबतचे आदेश दिंडोरी तालुका पुरवठा विभागाला प्राप्त झाले असून, त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत लाभार्थ्यांना डिसेंबर २०२३ अखेर संपूर्ण धान्य मोफत दिला जाणार आहे." - पंकज पवार, तहसीलदार, दिंडोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT