नाशिक

वास्तुविशारद, अभियंता संवादासाठी ‘फोरए’ उपक्रम

CD
फोटो : H33205 ------------- वास्तुविशारद, अभियंता संवादासाठी ‘फोरए’ उपक्रम दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात; विविध विषयांवर चर्चा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : शहरातील वास्तुविशारद आणि अभियंत्यांमध्ये व्यावसायिक सहकार्य आणि वैचारिक देवाणघेवाण वाढावी, या उद्देशाने वास्तुविशारद व अभियंता संघटना, नाशिकच्या वतीने ‘फोरए’ या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत नुकतीच दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेसाठी अहमदाबाद येथील प्रसिद्ध वास्तुविशारद राजीव कथपालिया आणि अभियंता विनोद शाह प्रमुख पाहुणे होते. विद्यार्थ्यांचा गौरव संघटनेच्या सदस्यांच्या व्यावसायिक कामांचे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आले होते. वास्तुकला आणि रचना शिक्षणातील शिक्षकांची भूमिका या विषयावर मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वास्तुकला महाविद्यालयाच्या प्राध्यापकांसोबत चर्चासत्र झाले. यावेळी २०२६ च्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत वास्तुकला आराखडा विषयात सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजाच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी श्रेयस पाटसकर याला ‘पद्मविभूषण वास्तुविशारद बी. व्ही. दोषी उत्कृष्टता पदक’ प्रदान करण्यात आले. वास्तुविशारद राजीव कथपालिया यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. तर दुसऱ्या क्रमांकाची विद्यार्थिनी अदिती फोफलीया हिचा अभियंता विनोद शाह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नालंदा आणि स्मृतिवन प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. वास्तुविशारद रोहन देवरे, शैलेश देवी, अभियंता प्रसन्न भोरे, विनोद शाह आणि राजीव कथपालिया यांच्या सहभागातून चर्चासत्र पार पडले. सूत्रसंचालन वास्तुविशारद रितू शर्मा यांनी केले. ‘वास्तुविशारद बी. व्ही. दोषी यांचे स्मरण’ या विषयावर वास्तुविशारद राधिका कथपालिया यांच्यात अनौपचारिक संवाद झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वास्तुविशारद पूर्वा शाह आणि उल्का वाजे यांनी केले. संघटनेचे अध्यक्ष वास्तुविशारद शीतल चौगुले यांनी स्वागत केले, तर सचिव वास्तुविशारद नकुल भावसार यांनी ‘फोरए’ मागील भूमिका स्पष्ट केली. उपाध्यक्ष अभियंता राजेंद्र बिरला यांनी आभार मानले. ----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

Das, Ranka News: CJP च्या सौरव दास, आशुतोष रांका यांना दिलासा; तब्बल ७ दिवस तिहारमध्ये राहिल्यानंतर...

Uday Samant : एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोपांची चौकशी व्हावी

Latest Marathi News Live Update : शिळे अन्न खाल्याने तेरा जणांना विषबाधा; तिघांवर उपचार सुरू

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

SCROLL FOR NEXT