smuggling turtles and parrots 
नाशिक

कासव, विदेशी पोपटांच्या तस्करीचे रॅकेट! नांदगावला वनविभागाची कारवाई

संजिव निकम

नांदगाव-मनमाड (जि. नाशिक) : देशी, विदेशी जातीचे कासव आणि विदेशी पोपट विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या मनमाड येथील दोघांना नांदगाव वनविभागाने ताब्यात घेतले आहे. यातील एक संशयित अल्पवयीन आहे. कासव व पोपट विक्री करण्यासाठी दुकानात ठेवल्याचे वनविभागाला आढळून आल्याने मुद्देमालासह संशयितांना ताब्यात घेतले. या प्राण्याची तस्करी करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Forest Department uncovered a racket to smuggling turtles and exotic parrots)

वनविभागाने केलेल्या कारवाईत तीन महिन्यांपासून कासव संशयितांच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात आले. कासव आणी पक्षांची तस्करी तालुक्यात होत असल्याचे उघड झाले असून मुख्य संशयिताचा विदेशी पाळीव पक्षांची विक्री करण्याचा व्यवसाय असून त्याआड इतर भारतीय पक्षी व कासव यांची तस्करी करीत असल्याचे वनविभागाने सांगितले.

नांदगांव वनविभागाकडून मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी डॉ. सुजित नेवासे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मनमाड येथे मनमाड मालेगांव चौफुलीवर कासव आणी पोपट विक्री होत असल्याचे समजले. या माहितीवरून घटनेची माहिती नांदगांव वनपरिक्षेत्र यांना कळविण्यात आली. यावरून नांदगावच्या वनविभागाने घटनास्थळी जाऊन त्यार दुकानाची झडती घेतली असता १४ कासव (अंदाजे वय ३ व ६ महिने) तर तीन कासव हे एका वर्षाचे असल्याचे दिसून आले. ते विक्रिच्या उद्देशाने ठेवल्याचे स्पष्ट झाले. एकून १७ कासव ताब्यात घेण्यात आले. पोपटांचा रंग रंगीबेरंगी तसेच निळा आहे. सातही पोपट ताब्यात घेण्यात आले. त्यातील चार नांदुरमधमेश्वर भागातील व तिन पक्षी नांदेड भागातील आहेत.

नांदगांव वनविभागाने मनमाड येथे टाकलेल्या धाडीत कासव, पक्षी हे सलीम सत्तार शेख (रा. मनमाड) याच्यासह सतरा वर्षीय संशयितांसह ताब्यात घेऊन त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम कायदा १९७२ च्या ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा वनपरिक्षेत्र येवला यांच्याकडे वर्ग करण्यात येत आहे. या कारवाईत प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी तानाजी भुजबळ, वनरक्षक तानाजी भुजबळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, एम. एम. राठोड, आर. के. दोंड, ए. एम. वाघ, एन. के. राठोड, सी. आर. मारगेपाड, पी. आर. पाटील आदींनी ही मोहिम पार पाडली.

कारवाईचा देखावा होता पण…

यातील लहान कासव ५०० रूपये जोडी, मोठे कासव त्याहून अधिकपटीने ग्राहकांच्या पसंतीने किंमत व विक्री केली जाते. पोपट पक्षी तीनशे ते पाचशे रूपये जोडीने विक्री होते. तालुक्यात मोर, पोपट, पारव, कबूतर, हरिण पाळणे या प्रकरणी नांदगाव वनविभागाने हे प्राणी व पक्षी ताब्यात घेतले, पण कारवाई झाली नाही. या घटनेमुळे परवानगी नसताना पक्षी, कासव, मोर पाळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अनेकांनी कोंबडी सोबत मोर पाळल्याचे वनविभागाने त्यांची सुटका केल्याचे प्रकार घडले आहे.

(Forest Department uncovered a racket to smuggleing turtles and exotic parrots)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT